५४ कुपोषित बालकांना बालरोगतज्ज्ञांनी घेतले दत्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 05:00 AM2020-07-30T05:00:00+5:302020-07-30T05:01:03+5:30

इंडियन अ‍ॅकडमी ऑफ पेडियाट्रिक संघटना आणि एकात्मिक बाल विकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने कुपोषण हटविण्यासाठी संयुक्तीत प्रयत्न सुरु केले आहे. शहरातील ३३ बालरोगतज्ज्ञांनी ५४ कुपोषित बालकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्यांना दत्तक घेतले आहे. बुधवारी येथील एका कार्यक्रमामध्ये दत्तक प्रक्रिया पार पडली.

54 malnourished children adopted by pediatricians | ५४ कुपोषित बालकांना बालरोगतज्ज्ञांनी घेतले दत्तक

५४ कुपोषित बालकांना बालरोगतज्ज्ञांनी घेतले दत्तक

Next
ठळक मुद्देउपचाराचा खर्च उचलणार : इंडियन अ‍ॅकेडमी आॅफ पेडियाट्रिक संघटना व बाल विकास प्रकल्पाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : इंडियन अ‍ॅकडमी ऑफ पेडियाट्रिक संघटना आणि एकात्मिक बाल विकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने कुपोषण हटविण्यासाठी संयुक्तीत प्रयत्न सुरु केले आहे. शहरातील ३३ बालरोगतज्ज्ञांनी ५४ कुपोषित बालकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्यांना दत्तक घेतले आहे. बुधवारी येथील एका कार्यक्रमामध्ये दत्तक प्रक्रिया पार पडली.
उद्घाटन उपमुख्य कार्यपालन अधिकारी संजय कोल्हे यांनी केले. अध्यक्षस्थानी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, आयएमए अध्यक्ष डॉ. माडुरवार, आय ए पी संघटनेचे अध्यक्ष डॉ. अपर्णा आंदनकर, संघटनेच्या सचिव डॉ. अभिलाषा गावतुरे, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रकाश भांदककर उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. गावतुरे यांनी केले. कार्यक्रमाची माहिती प्रकल्प अधिकारी भांदककर यांनी दिली. संचालन डॉ मुत्यतलवार, आभार डॉ. सोनाली कपूर यांनी मानले. यावेळी शहरातील नागरिक उपस्थित होते.

चंद्रपूर तालुक्यात मध्यम ५४ कुपोषित बालक
चंद्रपूर तालुक्यात ५४ मध्यम कुपोषित बालक आहे. यातील ९ बालक अतिकुपोषित आहे. या बालकांना यातून काढण्यासाठी इंडियन अकॅडमी आॅफ पेडियाट्रिक संघटनेने पाऊल उचलले आहे. या उपक्रमाला बालविकास प्रकल्प अधिकारी प्रकाश भांदककर यांनी विशेष परिश्रम घेतले. राज्यात पहिल्यांदात शासन आणि बालरोगतज्ज्ञ कुपोषण हटविण्यासाठी एकमेकांना सहकार्य करणार आहेत. चंद्रपूर तालुक्यात ग्रामीण भागात २१२ अंगणवारी केंद्र असून त्यात ९९३३ बालके आहेत. यामधील ५४ बालक मध्यम कुपोषित तर ९ बालक अतिकुपोषित आहेत. सध्या हा उपक्रम केवळ चंद्रपूर तालुक्यातील ग्रामीण भागापूरता मर्यादित आहे. एका बालरोगतज्ज्ञांनी साधापरणत दोन कुपोषित बालक दत्तक घेतली आहे.

या डॉक्टरांचा समावेश
बालकांच्या आरोग्यासाठी झटणाऱ्या इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक संघटनेच्या जिल्हाध्यक्ष डॉ. अपर्णा अंदनकर, डॉ. पल्लवी डोंगरे, डॉ. व्यंकटेश पंगा, डॉ. रवी मोहूर्ली, डॉ. अभिलाषा गावतुरे, डॉ. पियुष मुत्यालवार, डॉ. अभय राठोड, डॉ. गोपाल राठी, डॉ. भालचंद्र फालके, डॉ. आशिष धानोरकर, डॉ. सुवर्णा सोंडवले, डॉ. प्रशांत दास, डॉ. राजीव देवईकर, डॉ. राहुल तपासे, डॉ.गोपाल मुंधडा, डॉ. राम भरत, डॉ. अश्विनी भरत, डॉ. भावेश मुसळे, डॉ. एन.जे. खान, डॉ. रफिक मवानी, डॉ.प्रमोद भोयर, डॉ. राहुल मोगरे, डॉ.सीमा शर्मा, डॉ. अंकुश खिचडे, डॉ. जोत्स्ना उमरेडकर, डॉ. प्रियदर्शन मुठाळ, डॉ. सोनाली कपूर, डॉ.प्रीती चव्हाण, डॉ. इर्शाद शिवजी, डॉ. वनिता गर्गेलवार, डॉ.विजय करमरकर आदींचा समावेश आहे.

Web Title: 54 malnourished children adopted by pediatricians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.