जिल्ह्यात ५२७ एचआयव्ही रुग्ण

By Admin | Updated: April 27, 2016 00:44 IST2016-04-27T00:44:54+5:302016-04-27T00:44:54+5:30

प्रत्येक तालुकास्तरावर व प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य तपासणी करून एचआयव्ही बाधित रुग्णांची नोंद केली जात आहे.

527 HIV patients in the district | जिल्ह्यात ५२७ एचआयव्ही रुग्ण

जिल्ह्यात ५२७ एचआयव्ही रुग्ण

जनजागृती प्रभावी करण्याची गरज : ३२२ पुरुष तर २०२ महिलांचा समावेश
प्रवीण खिरटकर वरोरा
प्रत्येक तालुकास्तरावर व प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य तपासणी करून एचआयव्ही बाधित रुग्णांची नोंद केली जात आहे. यावर्षी चंद्रपूर जिल्ह्यात ३२२ पुरुष, २०२ महिला व तीन तृतीय पंथी असे एकूण ५२६ एचआयव्ही बाधित रुग्ण आढळून आले आहे. शासनातर्फे कोट्यवधी रुपये खर्चुन जनजागृती केली जात असली तरी एचआयव्हीचा प्रसार होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
एचआयव्हीचा समूळ नाईनाट झाला पाहिजे, याकरिता शासनाने मागील काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात तपासण्या व समाज सेवी संस्थांना सोबत घेवून समाज प्रबोधन करणे सुरू सुरू केले आहे. यासाठी शासनाच्या वतीनेही कोट्यवधींचा खर्च केला जात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र, प्रत्येक तालुका व जिल्हा स्तरावरील शासकीय रुग्णालयात एचआयव्ही तपासणी करणारे केंद्र व जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणी उपचार केंद्र तसेच त्याच केंद्रातून एचआयव्ही बाधितांना मार्गदर्शन देवून धिर दिला जात आहे. मागील काही वर्षापासून चंद्रपूर जिल्ह्यातील एचआयव्ही बाधीतांची संख्या कमी होत आहे, हे मान्य असले तरी जेवढ्या रुग्णांची नोंद दरवर्षी होत आहे, तो आकडाही मोठा आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. प्रत्येक गरोदर मातेला एचआयव्हीची तपासणी सक्तीची केली जात असल्याने एचआयव्ही निघाल्यास त्याची काळजी शासकीय रुग्णालयात घेतली जात आहे. मागील वर्षात ६० हजार २५६ पुरुष, महिला व तृतीय पंथीची तपासणी करण्यात आली. त्यात ३२२ पुरुष व २०२ ३२२ तर तीन तृतीयपंथी एचआयव्ही बाधित असल्याचे आढळून आले आहे.

सहा एचआयव्ही रुग्ण बेपत्ता
यापूर्वीचे ४७२ एचआयव्ही बाधित रुग्ण उपचार केंद्रात नियमित औषधोपचार घेत असल्याची चंद्रपूर जिल्ह्यात नोंद आहे. परंतु प्रत्यक्षात औषधी उपचार घेणारे ४६६ रुग्ण आहेत. त्यामुळे सहा रुग्ण बेपत्ता असल्याने त्यांच्याबाबत संपर्क साधूनही होत नसल्याने या रुग्णाबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

३८ तृतीयपंथीनी केली तपासणी
चंद्रपूर जिल्ह्यात ३८ तृतीयपंथीनी एचआयव्ही तपासणी करून घेतली. त्यात तीन रुग्णांना एचआयव्ही झाल्याचे आढळून आले. शासनाने मोठ्या प्रमाणात समाज प्रबोधन कार्यक्रम एचआयव्हीपासून रोखण्याकरिता हाती घेतला आहे. तसेच अनेक ठिकाणी मोफत सल्ला व औषधी उपचार केंद्र सुरू केले आहे. या सोबतच आरोग्य केंद्र, उपकेंद्र, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय या ठकाणी तपासणी केंद्र सुरू केल्याने एचआयव्ही बाधितांची संख्या कमी होत असून लवकरच आटोक्यात येईल.
- सुमन पानगंटीवार, कार्यक्रम अधिकारी चंद्रपूर

प्रभावी जनजागृतीची गरज
शासनातर्फे ठिकठिकाणी एचआयव्ही, एड्सबाबत जनजागृती केली जात आहे. एचआयव्हीचा प्रसार होऊ नये म्हणून दक्षता बाळगली जात आहे. तरीही रुग्णांची नोंद होत असल्याने ही जनजागृती आणखी प्रभावी होण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Web Title: 527 HIV patients in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.