गिट्टीच्या ट्रकमधून ५२० पेट्या दारु जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 05:00 AM2019-11-12T05:00:00+5:302019-11-12T05:00:37+5:30

गुन्हे शाखा चंद्रपूर व सावली पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करीत ट्रक जप्त केला. सदर कारवाही सोमवारी पहाटे करण्यात आली. या कारवाईमध्ये ७१ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून चार जणांना अटक करण्यात आली आहे. तालुक्यातील आजपर्यंतच्या कारवाईत ही सर्वात मोठी घटना असल्याचे बोलल्या जात आहे.

520 boxes of alcohol seized from ballast truck | गिट्टीच्या ट्रकमधून ५२० पेट्या दारु जप्त

गिट्टीच्या ट्रकमधून ५२० पेट्या दारु जप्त

Next
ठळक मुद्देसावलीत कारवाई : ७१ लाख रुपयांचा माल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सावली पोलीस स्टेशन अंतर्गत हरांबा-सावली मार्गावर एका गिट्टीच्या ट्रकमध्ये तब्बल ५२० पेट्या दारुची वाहतूक करताना स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर व सावली पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करीत ट्रक जप्त केला. सदर कारवाही सोमवारी पहाटे करण्यात आली. या कारवाईमध्ये ७१ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून चार जणांना अटक करण्यात आली आहे. तालुक्यातील आजपर्यंतच्या कारवाईत ही सर्वात मोठी घटना असल्याचे बोलल्या जात आहे.
सावली परिसरात देशी व विदेशी दारुची विक्री सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर व सावली पोलिसांनी मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून हरांबा, सावली मार्गावर हायवा ट्रक क्रमांक एमएच ३१ सीक्यू २८३५ ची तपासणी केली असता त्यामध्ये ५०० पेट्या देशी व २० पेट्या विदेशी दारू आढळून आली. सदर ट्रकमध्ये खाली दारूच्या पेट्या आणि वरून गिट्टी ठेवल्याचे पोलिसांना यावेळी आढळले.
सदर कारवाईत प्रशांत मल्लेश मेरफुलवार रा. हरंबा, शंकर सावरदास कांबळे रा. गोंदिया, नागराज अल्लूरवार रा. सावली, धमेंद्र सुरेश शर्मा रा. गोंदिया यांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आजपर्यंत झालेल्या कारवाईत तालुक्यातील सर्वात मोठी कारवाही असल्याचे बोलल्या जात आहे. विशेष म्हणजे, मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात दारूची विक्री सुरु आहे. त्यामुळे कारवाई करण्याची मागणी तालुक्यातील महिलांनी पोलिसांकडे केली होती.

Web Title: 520 boxes of alcohol seized from ballast truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.