५२ कोरोनामुक्त तर ३१ नव्यांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:28 IST2020-12-29T04:28:02+5:302020-12-29T04:28:02+5:30

चंद्रपूर : जिल्ह्यात सोमवारी ५२ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर ३१ कोरोनाबाधित रुग्णांची ...

52 corona free and 31 new ones added | ५२ कोरोनामुक्त तर ३१ नव्यांची भर

५२ कोरोनामुक्त तर ३१ नव्यांची भर

चंद्रपूर : जिल्ह्यात सोमवारी ५२ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर ३१ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली असून दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २२ हजार २१० वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २१ हजार ३२१ झाली आहे. सध्या ५२८ बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ७० हजार ७५ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख ४५ हजार ३७६ नमुने निगेटिव्ह आले आहेत.

सोमवारी मृत झालेल्यामध्ये राणी लक्ष्मी वार्ड बल्लारपूर येथील ६० वर्षीय पुरूष व गजानन महाराज चौक चंद्रपूर मुळ रा. गडचिराली येथील ५७ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३६१ बाधितांचा मृत्यू झाला असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३३३, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १७, यवतमाळ सात, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

सोमवारी बाधित म्हणून समोर आलेल्या ३१ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील १६, चंद्रपूर तालुका चार, भद्रावती एक, सिंदेवाही दोन, चिमूर तीन, वरोरा चार व इतर ठिकाणच्या एका रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान, नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Web Title: 52 corona free and 31 new ones added