लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शरीराला चिकटपट्टीच्या साह्याने दारु चिकटवून तस्करी करणाऱ्या तीन दारु तस्करांना एसएसटी पथक प्रमुख राजेंद्र कोरे यांच्या नेतृत्वातील पथकाने अटक केली. त्यांच्याकडून ५० हजार रुपयांची देशी दारु जप्त करण्यात आली. ही कारवाई शनिवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घुग्घुस वणी नाक्यावर करण्यात आली. या कारवाईत रविंद्र सुधाकर जिव्हारे (३४), कृष्णदास शिवदास देवनाथ (३५) रा. इंदिरानगर चंद्रपूर व अन्य एकाला अटक केली.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एसएसटी पथक सक्रीय झाले आहे. सोमवारी सायंकाळी ७.३० वा. वणी-चंद्रपूर बस क्रमांक एम एच ४० एच ८६३२ या वाहनाची तपासणी करताना तीन प्रवाश्यांवर पथकातील कर्मचाऱ्यांना संशय आला.दरम्यान त्यांनी त्यांची तपासणी केली असता देशी दारुच्या शिश्या संपूर्ण शरीराला चिकटपट्टीच्या साह्याने चिकटवल्या होत्या. त्या तिघांनाही पथकांनी पकडून घुग्घुस पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविला. ही कारवाई पथक प्रमुख राजेंद्र कोरे, प्रफुल्ल पिंपळकर, अशोक उराडे, अजीत देशकर, विस्तार अधिकारी भगत, भारत सोयाम आदींनी केली.
बसमधून ५० हजारांचा दारुसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 00:34 IST
शरीराला चिकटपट्टीच्या साह्याने दारु चिकटवून तस्करी करणाऱ्या तीन दारु तस्करांना एसएसटी पथक प्रमुख राजेंद्र कोरे यांच्या नेतृत्वातील पथकाने अटक केली. त्यांच्याकडून ५० हजार रुपयांची देशी दारु जप्त करण्यात आली.
बसमधून ५० हजारांचा दारुसाठा जप्त
ठळक मुद्देतिघांना अटक : एसएसटी पथकाची कारवाई