शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी ५० लाखांची तरतूद

By admin | Updated: June 11, 2014 23:51 IST

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत बुधवारी अंदाजपत्रक सादर करण्यात आले. यावर्षी खरेदी योजनांवर भर देण्यात आला आहे. याशिवाय स्पर्धात्मक परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना इतरत्र

चंद्रपूर : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत बुधवारी अंदाजपत्रक सादर करण्यात आले. यावर्षी खरेदी योजनांवर भर देण्यात आला आहे. याशिवाय स्पर्धात्मक परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना इतरत्र भटकू नये यासाठी ५० लाख रुपयांचे ज्युबिली हायस्कूल परिसरात पूर्वतयारी केंद्र उभारण्यावर तरतूद करण्यात आली आहे.यावर्षी ५६ कोटी ३६ लाख रुपयांचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. यात जास्तीत जास्त खरेदीवर भर देण्यात आला आहे. पाणी पुरवठा निधीमध्ये यावर्षी कपात करण्यात आली आहे. महिला बाल कल्याणच्या योजनांसाठी १ कोटी ९ लाखांची अतिरिक्त तरतूद करण्यात आली. विशेष करून मागणी नसलेले सौर कंदिल, कौर कुंपन, प्रशिक्षण आदींवर जास्त निधी ठेवण्यात आल्याचा सदस्यांचा आरोप आहे.यावर्षी आचारसंहितेच अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. त्यामुळे केवळ अधिकाऱ्यांनी आपल्या मर्जीनुसार यात भर दिल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. जिल्हा परिषदेने पहिल्यांदात स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्रासाठी तब्बल ५० लाख रुपयांची तरतूद केली आहे. ग्रामीण भागातील सुशिक्षीत बेरोजगारांना वेगवेगळ्या स्पर्धा परिक्षेची तयारी सेवाभावी तज्ञांकडून करून देण्यासाठी येथील ज्युबिली हायस्कूल परिसरात इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे. प्रस्तावित इमारतीत तळ मजला व पहिला माळा आहे. तळमजला ७७०.८५ चौ.मी. व पहिला माळा ८१२.६५ चौ.मी. बांधकाम असून तळ मजल्यात केंद्र प्रमुखांचे कार्यालय, प्रशासकीय दालन, सभागृह, करमणूक केंद्र, गोडावून, प्राध्यापक वर्गाकरिता बसण्याची सोय, अभ्यांगताकरिता बसण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय व स्वच्छता गृह तर पहिल्या माळ्यावर शिकवणी वर्ग, वाचनालय तसेच मध्ये खुला जागा व चारही बाजूने बांधकामाचा समावेश राहणार आहे. पूर्ण प्रकल्पास नकाशाप्रमाणे बांधकामास १.५० लाख खर्च करण्यात येणार आहे. याशिवाय फर्निचर, पार्टीशन, वीज, वातानुकूलीत यंत्रणा व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आहे. याशिवाय स्वयंसहाय्यता बचत समूहाच्या माध्यमातून सॅनिटरी नॅपकिन प्रकल्पही मंजूर करण्यात आला आहे. यामुळे बचत गटातील महिलांना रोजगार मिळणार आहे.विशेष म्हणजे, वेबसाईटच्या माध्यमातून तक्रार निवारण सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सभेला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संतोष कुमरे, उपाध्यक्ष संदिप गड्डमवार, सर्व सभापती, मुख्य कार्यपालन अधिकारी आशुतोष सलिल, अन्य विभागप्रमुख आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)