जिल्ह्यातील पाच लाख सातबारांचे संगणीकरण

By Admin | Updated: July 6, 2014 23:51 IST2014-07-06T23:51:28+5:302014-07-06T23:51:28+5:30

राष्ट्रीय भूमिअभिलेख आधुनिकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ५ लाख १० हजार ६४१ सातबाराचे संगणीकरण्याचे काम अंतिम टप्प्यात असून १ आॅगस्टपासून हस्तलिखित सातबारा बंद करण्याचे धोरण महाराष्ट्र

5 lakh seven-bar compilation of the district | जिल्ह्यातील पाच लाख सातबारांचे संगणीकरण

जिल्ह्यातील पाच लाख सातबारांचे संगणीकरण

चंद्रपूर : राष्ट्रीय भूमिअभिलेख आधुनिकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ५ लाख १० हजार ६४१ सातबाराचे संगणीकरण्याचे काम अंतिम टप्प्यात असून १ आॅगस्टपासून हस्तलिखित सातबारा बंद करण्याचे धोरण महाराष्ट्र शासनाने आखले आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सातबारा संगणकीकृत देण्याचा पुढाकार जिल्हा प्रशासनाने घेतला असून कोरपना तालुक्यात १५ जुलै पासूनच अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यासाठी सर्व तलाठ्यांना देण्यासाठी लॅपटॉप उपलब्ध आहेत.
भूमिअभिलेखाचे जतन करण्यासाठी अभिलेख स्कॅनिग कार्यक्रम राबविला जाणार असून पहिल्या टप्प्यात मूल, नागभीड, सिंदेवाही, राजुरा, चंद्रपूर या तालुक्यातील अभिलेख स्कॅनिंग करण्यात येणार आहे. उर्वरीत तालुक्याचे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा निश्चय करण्यात आला आहे. जिल्ह्यात १९ लाख ९५ हजार अभिलेखे असून या सर्वाचे स्कॅनिंग करण्यात येणार आहे. आता आॅनलाईन फेरफार मिळणार असून यासाठी जिल्ह्यातील तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी व म्युटेशनचे कर्मचारी अशा एकूण २२४ डिजिटल स्वाक्षरी करुन संबंधितांना वितरीत करण्यात आल्या आहेत.
चंद्रपूर तालुक्यातील १०३ गावांमध्ये ३८५३८ साताबारा, बल्लारपूर ३५ गावात ८६०६, मूल १११ गावात ३५७४८, सावली ११८ गावात ४६१५३, पोंभुर्णा ७१ गावात १९३६५, गोंडपिपरी ९८ गावात २५१३९, वरोरा १८४ गावात ४२०००, भद्रावती १६४ गावात ३४७८५, चिमूर २६९ गावात ५२७९३, नागभीड १३८ गावात ४७०४६, सिंदेवाही ११५ गावात ४४०२६, ब्रह्मपुरी १४० गावात ५५३५३, राजुरा १११ गावात २९२२१, कोरपना ११३ गावात २०४१९ व जिवती ८३ गावात ११४५१ अशी एकूण १८३६ गावामध्यो ५ लाख १० हजार ६४३ सातबाराची संख्या आहे.
सातबाराच्या आधुनिकरणाचे काम युद्धस्तरावर सुरू असून लवकरच हे काम पूर्ण होणार आहे. हस्तलिखित सातबारा देणे बंद करण्यात येणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स सातबारा देण्यासाठी जिल्ह्यातील २८४ तलाठी व ३७ मंडळ अधिकाऱ्यांसाठी लॅपटॅप उलब्ध आहेत. यासोबतच डाटा कार्डही पूरविण्यात येणार आहे.
जिल्ह्यात भूमिअभिलेख आधुनिकरण कार्यक्रमाअंतर्गत इ- फेरफार या आज्ञानवलीची अंमलबजावणी करण्याचे काम प्रगतीपथावर असून १५ तालुक्यांमध्ये डाटा करेक्शन तसेच डाटा अपडेशनचे काम अंतिम टप्प्यात आहेत. कोरपना तालुक्यातील काम पूर्ण झाले असून सातबाराचे प्रिन्ट तलाठ्याकडून तपासले आहे.
या ठिकाणी १५ जुलैपासूनच हस्तलिखित सातबारा देण्याचे काम बंद करण्यात येणार आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: 5 lakh seven-bar compilation of the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.