५ लाख ४२ हजार तपासण्या, ८४ हजार ५९२ निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:20 IST2021-06-24T04:20:11+5:302021-06-24T04:20:11+5:30

बाधित आढळलेल्या १८ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील ७, चंद्रपूर तालुका २, बल्लारपूर १, सिंदेवाही १, मूल १, गोंडपिपरी १, ...

5 lakh 42 thousand checks, 84 thousand 592 negative | ५ लाख ४२ हजार तपासण्या, ८४ हजार ५९२ निगेटिव्ह

५ लाख ४२ हजार तपासण्या, ८४ हजार ५९२ निगेटिव्ह

बाधित आढळलेल्या १८ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील ७, चंद्रपूर तालुका २, बल्लारपूर १, सिंदेवाही १, मूल १, गोंडपिपरी १, चिमूर १, वरोरा व कोरपना तालुक्यात प्रत्येकी २ रुग्णांचा समावेश आहे. भद्रावती, ब्रह्मपुरी, नागभीड, सावली, पोंभुर्णा, राजुरा, जिवती तालुक्यात आज एकही रुग्ण आढळला नाही. आज मृत झालेल्यांमध्ये बल्लारपूर तालुक्यातील १ पुरुष, गोंडपिपरी १ आणि वरोरा तालुक्यातील एका पुरुषाचा समावेश आहे. एकूण बाधितांची संख्या ८४ हजार ५९२ वर पोहोचली आहे. आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ८२ हजार ४७४ झाली आहे. सध्या ५९६ बाधितांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात कोरोनामुळे १५२२ बाधितांचे मृत्यू झाले आहेत. नागरिकांनी कोरोना पूर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीचा नियमित वापर करावा, जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Web Title: 5 lakh 42 thousand checks, 84 thousand 592 negative