जिल्ह्यासाठी ४०५ कोटी २ लाख ९५ हजारांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:40 IST2021-02-05T07:40:57+5:302021-02-05T07:40:57+5:30
यावेळी जिल्हा परिषदच्या अध्यक्ष संध्या गुरनुले, खासदार बाळू धानोरकर, खासदार अशोक नेते, लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार ...

जिल्ह्यासाठी ४०५ कोटी २ लाख ९५ हजारांचा निधी
यावेळी जिल्हा परिषदच्या अध्यक्ष संध्या गुरनुले, खासदार बाळू धानोरकर, खासदार अशोक नेते, लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार रामदास आंबटकर, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी रोहन घुगे, जिल्हा नियोजन अधिकारी ग. रू. वायाळ आदी उपस्थित होते. पालकमंत्री वडेट्टीवार यांनी पंतप्रधान आवास योजनेतंर्गत बांधण्यात येणाऱ्या सर्व घरकुल योजनांना मोफत रेती देण्याचेही निर्देश सर्व उपविभागीय अधिकारी यांना दिले. यावेळी त्यांनी विविध विभागाचा आढावा घेतला. बैठकीत आ. मुनगंटीवार यांनी कृषी क्षेत्रावर निधी वाढवून देण्याची मागणी केली. आचारसंहितेमुळे निधी खर्च करता येत नाही, त्यामुळे ज्या भागात निवडणूक आहे त्या भागापुरतीच आचारसंहितेची अंमलबजावणी करून इतर भागांत विकास निधी खर्च करण्यास मोकळीक देण्याची मागणी आ. धोटे यांनी यांनी केली. बैठकीला विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.