४ लाख ४६ हजार ७६९ नमुने निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:20 IST2021-06-20T04:20:14+5:302021-06-20T04:20:14+5:30

जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ८४ हजार ५१५ वर पोहोचली आहे. सुरूवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ८२ हजार २६८ झाली ...

4 lakh 46 thousand 769 samples negative | ४ लाख ४६ हजार ७६९ नमुने निगेटिव्ह

४ लाख ४६ हजार ७६९ नमुने निगेटिव्ह

जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ८४ हजार ५१५ वर पोहोचली आहे. सुरूवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ८२ हजार २६८ झाली आहे. सध्या ७३३ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ५ लाख ३३ हजार ९५७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४ लाख ४६ हजार ७६९ नमुने निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत १,५२६ बाधितांचे मृत्यू झाले आहे. कोरोना पूर्णपणे संपला नाही. त्यामुळे मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसुत्रीचा नियमित वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

तालुकानिहाय पॉझिटिव्ह

बाधित आढळलेल्या ५४ रूग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील १७, चंद्रपूर तालुका ५, बल्लारपूर ११, भद्रावती, सिंदेवाही, मूल, पोंभूर्णा, गोंडपिपरी तालुक्यात प्रत्येकी एक, सावली २, राजुरा ३, चिमूर २, वरोरा २, कोरपना येथील ७ रूग्णांचा समावेश आहे. ब्रह्मपुरी, जिवती व नागभीड तालुक्यात एकही रूग्ण आढळला नाही.

Web Title: 4 lakh 46 thousand 769 samples negative