जिल्ह्यात ४ कोरोनामुक्त, १ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:31 IST2021-09-22T04:31:45+5:302021-09-22T04:31:45+5:30

चंद्रपूर : मागील २४ तासांंत जिल्ह्यात ४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच एक ...

4 corona free, 1 positive in the district | जिल्ह्यात ४ कोरोनामुक्त, १ पॉझिटिव्ह

जिल्ह्यात ४ कोरोनामुक्त, १ पॉझिटिव्ह

चंद्रपूर : मागील २४ तासांंत जिल्ह्यात ४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच एक जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात मंगळवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.

बाधित आलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील एका रुग्णाचा समावेश आहे. चंद्रपूर तालुका, बल्लारपूर, भद्रावती, ब्रम्हपुरी, नागभीड, सिंदेवाही, मूल, सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, राजुरा, चिमूर, वरोरा, कोरपना, जिवती येथे एकही रुग्ण आढळला नाही.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ८८ हजार ७०६ वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ८७ हजार १३९ झाली आहे. सध्या २७ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ६ लाख ९१ हजार ७७० नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ६ लाख १ हजार ७८८ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ५४० बाधितांचे मृत्यू झाले आहे.

Web Title: 4 corona free, 1 positive in the district