शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
4
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
5
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
6
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
7
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
8
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
9
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
10
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
11
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
12
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
13
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
14
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
15
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
16
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
17
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
18
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
19
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
20
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विभागातील ३७ हजार पाणी नमुने अद्याप तपासणीविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 07:00 IST

यंदा लॉकडाऊनमुळे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेला नागपूर विभागातील ३७ हजार पाण्याचे नमुने अद्याप तपासता आले नाही. त्यामुळे जलजन्य आजार वाढण्याची भीती ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देपावसाळ्यात उद्भवणार जलजन्य आजारांचा धोकालॉकडाऊनचा अडसर

लोकमत न्यूज नेटवर्कराजेश मडावीचंद्रपूर : आदिवासी व ग्रामीण भागात पावसाळ्यात जलजन्य आजार उद्भवू नये, याकरिता राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम अंतर्गत दरवर्षी मे महिन्यात विभागनिहाय पाण्याचे नमुने तपासण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाते. मात्र, यंदा लॉकडाऊनमुळे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेला नागपूर विभागातील ३७ हजार पाण्याचे नमुने अद्याप तपासता आले नाही. त्यामुळे जलजन्य आजार वाढण्याची भीती ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून वर्तविली जात आहे.राज्यातील पुणे, कोकण, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर विभागात दरवर्षी एकून सार्वजनिक जलस्त्रोत, पाण्याचे नमुने आणि नमुने तपासणीचे उद्दिष्ट निश्चित केले जाते. त्यासाठी राज्याचा भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा सर्व जिल्ह्यातील पाणी तपासणी प्रयोग शाळांकडे जबाबदारी सोपविते. गतवर्षीच्या सर्वेक्षणानुसार राज्यातील सहा विभागात २ लाख १२ हजार ६१४ सार्वजनिक जलस्त्रोतांची नोंद करण्यात आली. यातील १ लाख ५० हजार १६ पाणी नमुन्यांची तपासणी शिल्लक आहे. नागपूर विभागात ७१ हजार ७३ जलस्त्रोत असून ३६ हजार ५६६ पाण्याचे नमुने मे २०२० पर्यंत तपासणीचे नियोजन भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने केले होते. त्यातील ३० हजार ४०० नमुने तपासण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. मात्र, लॉकडाऊन लागू झाल्याने ३७ हजार ७२ नमुन्यांची अद्याप तपासणीच होऊ शकली नाही. पाण्याचे नमुने तपासण्यात मागे पडलेल्या औरंगाबाद विभागानंतर नागपूर विभागाचा दुसरा क्रमांक आहे.पाणी तपासणीचे कारण?भूजलक्षेत्रात काम करणारे नियोजक, धोरण आखणाºया निमशासकीय संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच भूजल क्षेत्रात संशोधन व विकास साधणाºया यंत्रणांना पाण्याबाबत सर्वकष माहिती भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडे उपलब्ध असणे आवश्यक आहे. अन्यथा भूजल विकासाशी निगडीत समस्यांना तोंड द्यावे लागते. पाण्याचे नमुने तपासणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ग्रामपंचायतस्तरावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी संबंधित अहवाल अत्यंत उपयुक्त ठरतो. मात्र, कोरोनाचा कहर सुरू असताना ऐन पावसाळ्यात नागपूर विभागात यंदा नमुने तपासणीचे काम पूर्ण होऊ शकले नाही.चंद्रपूरात मान्सूनपूर्व ११ हजार ५५१ नमुने संकलनचंद्रपूर जिल्ह्यात २०१९-२० मान्सूनकरिता १४ हजार ९७१ पाणी नमुने तपासणीचे उद्दिष्ट होते. यापैकी प्राप्त झालेल्या १३ हजार २०६ नमुन्यांची तपासणी झाली. २००२०-२१ मान्सूनपूर्व १४ हजार ९७१ नमुन्यांचे उद्दिष्ट मिळाले होते. लॉकडाऊनच्या काळातही १३ हजार ५५१ नमुने प्राप्त करण्यात चंद्रपूर भूजल सर्वेक्षण विभागाला यश आले. मात्र, या नमुन्यांचे अद्याप विश्लेषण झाले नाही. ३० जूनपर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती चंद्रपूर भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा कार्यालयाने दिली.जलस्त्रोतांच्या पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करणे अत्यावश्यक आहे. पावसाळ्यात विविध आजार होऊ नये, याकरिता सदर अहवालावरूनच विविध प्रतिबंधक उपाययोजना केल्या जातात. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील उर्वरित गावांतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेला पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत.-राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. चंद्रपूर

टॅग्स :Waterपाणी