बस अपघातात ३४ प्रवासी जखमी

By Admin | Updated: August 13, 2014 23:44 IST2014-08-13T23:44:46+5:302014-08-13T23:44:46+5:30

जिल्हात दोन वेगवेगळ्या बस अपघातात ३४ प्रवाशी जखमी झाले. यातील ४ जणांची प्रकृती गंभीर आहे. पहिली घटना राजुरा-आसिफाबास रस्त्यावर घडली. यात २६ प्रवासी जखमी झाले.

34 passengers were injured in the accident | बस अपघातात ३४ प्रवासी जखमी

बस अपघातात ३४ प्रवासी जखमी

राजुरा/राजोली : जिल्हात दोन वेगवेगळ्या बस अपघातात ३४ प्रवाशी जखमी झाले. यातील ४ जणांची प्रकृती गंभीर आहे. पहिली घटना राजुरा-आसिफाबास रस्त्यावर घडली. यात २६ प्रवासी जखमी झाले. तर दुसरी घटना मूल तालुक्यातील राजोली येथून जवळच असलेल्या डोंगरगाव येथे घडली. यात आठ जण जखमी झाले आहे.
राजुरा येथून बस एपीजेड ३४१० सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान आसिफाबाद येथे जात होती. दरम्यान देवाडा चेक पोस्टजवळ ट्रक क्रम. एमएच ३४ एबी ४४६४ ला ओव्हरटेक करताना समोरील ट्रकला जबर धडक दिली. यात २६ प्रवाशी जखमी झाले. प्रवाशांना देवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. यातील ललिता ताडवीणा (४५), शांता गोडपल्लीवार (३७) आसिफाबाद, नगमा गादगीरवार(३५) लक्कडकोट गंभीर जखमी झाले आहे.
दुसरी घटना मूल तालुक्यातील राजोली येथून दोन किमी अंतरावर असलेल्या डोंगरगाव येथे घडली. चंद्रपूर येथून ब्रह्मपुरीकडे एमएच ४० एन. ९९८३ क्रमांकाची बस जात असताना मागुन येणारा मिनीडोअर क्रमांक एमएच ३४ एडी ३०९३ चा समोरील टायर फुटल्याने चालकाचे संतुलन बिघडले आणि मिनीडोअर बसवर आदळला. यात मिनीडोअरचा चालक गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले आहे. तर बस चालक प्रशांत नारायण कुनरपवार(४०) चंद्रपूर, प्रवाशी जीवनदास इंदरशाह कुळमेथे (४०) ठाणेवासना (पोंभूर्णा), रुपेश भिमराव शंभरकर (३६) देसाईगंज, देवानंद दामोदर खोब्रागडे (३२) गिरगाव, तुमराज निलकंठ लाखे(३७) ब्रह्मपुरी, सुनीता उद्धव मडावी(३०), नागपूर, उद्धव सदूजी मडावी (३७) नागपूर, मिनीडोअर वाहक धिरज गजानन वांढरे (४०) चंद्रपूर हे जखमी झाले आहे.
त्यांना उपचासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.
जखमी प्रवाशांना आर्थिक मदत देण्याचे काम महामंडळाने सुरु केल्याची माहिती मिळाली आहे.(शहर प्रतिनिधी)

Web Title: 34 passengers were injured in the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.