शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद शाळांना हव्या ३२६ नवीन वर्ग खोल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2015 00:41 IST

जिल्हा परिषद मार्फत जिल्ह्यात १ हजार ५७२ प्राथमिक शाळा सुरू आहेत. मात्र अनेक शाळांमध्ये वर्ग खोल्यांची कमरता आहे.

बसण्यासाठी अडचण : अनेक ठिकाणी दोन वर्गाचे विद्यार्थी बसतात एकत्रमंगेश भांडेकर चंद्रपूरजिल्हा परिषद मार्फत जिल्ह्यात १ हजार ५७२ प्राथमिक शाळा सुरू आहेत. मात्र अनेक शाळांमध्ये वर्ग खोल्यांची कमरता आहे. वर्ग खोल्यांचे बांधकाम करण्याची मागणी गावकऱ्यांकडून सतत होत असतानाही याकडे जिल्हा परिषद प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. परिणामी अनेक शाळेतील विद्यार्थ्यांना दोन वर्गाचे विद्यार्थी मिळून किंवा शाळा परिसरातील झाडाखाली, वऱ्हाड्यांत बसून शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहे.जिल्हा परिषदेमार्फत सध्यास्थितीत १ हजार ५७२ प्राथमिक शाळा, २१ माध्यमिक शाळा व ३ जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा सुरू आहेत. यासाठी जिल्हा परिषद प्रशासनामार्फत सध्यास्थितीत ६ हजार ५२० वर्ग खोल्या आहेत. मात्र अजूनही नवीन ३२६ वर्ग खोल्यांची आवश्यकता आहे. चालु सत्रात जिल्हा परिषदेच्या १ हजार ५७२ शाळांमध्ये १ लाख १५ हजार १७३ विद्यार्थी पटसंख्या आहे. तर २१ माध्यमिक शाळांमध्ये ४ हजार ९५७ व ३ उच्च माध्यमिक शाळांमध्ये २ हजार २०१ विद्यार्थी शिक्षण घेत आहे. मात्र वर्ग खोल्यांची अडचण शिक्षकांना अध्यापन प्रक्रियेत येत असल्याने अनेकदा दोन वर्गाच्या विद्यार्थ्यांना एकत्र करून किंवा शाळा परिसरातील झाडाखाली तसेच वऱ्हांड्यात बसवून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे द्यावे लागत आहे. शाळा व्यवस्थापन समित्यांमार्फत वर्ग खोली बांधकामासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. मात्र जिल्हा परिषद प्रशासन शाळांना नव्या वर्ग खोल्या बांधून देण्यास दिरंगाई करीत आहे. २०१४-१५ या शैक्षणिक वर्षात जिल्हा परिषद प्रशासनाकडून ७५ वर्ग खोल्यांचे बांधकाम झाले आहे. यामुळे काही शाळांमध्ये वर्ग खोल्यांचा प्रश्न मिटला आहे. मात्र आजही ३२६ नव्या वर्ग खोल्यांची आवश्यकता असल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने निधी उपलब्ध करून देऊन नवीन वर्ग खोल्यांचे बांधकाम करून देण्याची मागणी शाळा व्यवस्थापन समित्यांकडून होत आहे, याची प्रशासनाने दखल घ्यावी.अध्यापनावर परिणाम वर्गखोल्यांची कमतरता असल्यास अनेकदा दोन वर्गाच्या विद्यार्थ्यांना एकत्र किंवा शाळा परिसरातील झाडाखाली व वऱ्हाड्यांत बसवून धडे दिले जाते. मात्र अशावेळी विद्यार्थ्यांचे लक्ष अध्यापनात लागत नाही. तिथे घडणाऱ्या गोष्टी त्यांच्या नजरेत पडत असल्याने विद्यार्थ्यांचे लक्ष विचलीत होत असते. इमारतींची व्हावी दुरूस्तीअनेक जिल्हा परिषद शाळांच्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात पाणी गळत असते. दरवर्षी डागडुजी करून वर्ग भरविले जातात. मात्र दरवर्षीच अशा समस्या उद्भवत असल्याने इमारतींची चांगल्या प्रकारे दुरुस्ती करण्याची मागणी आहे.शासकीय अनुदानातून खर्च निरंकशाळांमध्ये विविध सुविधा पुरविण्यासाठी शासकीय अनुदान मिळत असते. मात्र २०१४-१५ या वर्षात सर्व व्यवस्थापनामध्ये शासकीय अनुदातून कोणतीही कामे करण्यात आलेली नाही. कार्यालय भवनासाठी साधन सामुग्री, इमारत बांधकाम दुरूस्ती, वसतिगृह, आकस्मीक खर्च, ग्रंथालय अशा बाबींसाठी शासकीय अनुदान खर्च करायचे असते. मात्र यावर्षीचा खर्च निरंक आहे.