शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

गोंडकालीन किल्ल्यांच्या स्वच्छतेला ३०० दिवस पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 23:33 IST

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : शहरातील साडेपाचशे वर्षे प्राचीन गोंड़कालिन किल्ले व परकोटावर बऱ्याच ठिकाणी वृक्ष-वेली वाढल्या़ शिवाय, नागरिकांनी कचरा टाकल्यामुळे मूळ चेहरा विद्रूप झाला़ हा प्रकार वाढल्यास ऐतिहासिक वारसा संपण्याचा धोका निर्माण होऊ शकतो़ त्यामुळे इको-प्रो संस्थेच्या वतीने 'स्वच्छ भारत अभियान'अंतर्गत किल्ला परकोट स्वच्छता अभियान सुरु करण्यात आले़स्वच्छता अभियानमध्ये रोज सकाळी ...

ठळक मुद्देइको-प्रो संस्थेचा पुढाकार : नागरिकांना इतिहास जाणून घेता येणार

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : शहरातील साडेपाचशे वर्षे प्राचीन गोंड़कालिन किल्ले व परकोटावर बऱ्याच ठिकाणी वृक्ष-वेली वाढल्या़ शिवाय, नागरिकांनी कचरा टाकल्यामुळे मूळ चेहरा विद्रूप झाला़ हा प्रकार वाढल्यास ऐतिहासिक वारसा संपण्याचा धोका निर्माण होऊ शकतो़ त्यामुळे इको-प्रो संस्थेच्या वतीने 'स्वच्छ भारत अभियान'अंतर्गत किल्ला परकोट स्वच्छता अभियान सुरु करण्यात आले़स्वच्छता अभियानमध्ये रोज सकाळी सहा ते नऊ या वेळेत श्रमदान करून शहरातील किल्ल्यांवरील उगविलेली झाडे व नागरिकांनी टाकलेला कचरा साफसफाई केली जात आहे़ आतापर्यंत अभियानात चंद्रपूर किल्ला परकोटचे ४ दरवाजे, ५ खिडक्या, ३९ बुरुजांपैकी २९ बुरूजांची स्वच्छ करण्यात आली आह़े़ किल्लाच्या भिंतीपैकी ७० टक्के भिंती व किल्ल्यावरुन पायदळ चालण्याच्या मार्गाची स्वछता करण्यात आली आहे़ किल्ल्याच्या विविध भागांची स्वच्छता झाल्यान नागरिकांना ऐतिहासिक सहल करता येऊ शकते़़ पर्यटक आणि विद्यार्थ्यांना गोंडकालिन स्थळांना भेट देऊन इतिहास व वास्तुंची माहिती जाणून आता शक्य झाले आहे़किल्ले परिसरातही स्वच्छतापठाणपूरा, जटपुरा, बिनबा, अंचलेश्वर गेट, विठोबा खिडकी, हनुमान खिड़की, बगड़ खिड़की, मसन खिडकी, चोर किडकी, आंबेकर लेआऊट, शाही मशीद, कोनेरी ग्राऊंड, दादमहल, आंबेकर लेआऊट आदी परिसरातही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली़सहकार्याची गरजकिल्ला परिसर आणि किल्ल्यावर घाण पसरू नये, याकरिता शहरातील प्रत्येक नागरिकाने सहकार्य केल्यास हा ऐतिहासिक हजारो वर्षांपर्यंत कायम राहणार आहे़ त्यासाठी मोहिमेला चळवळीचे स्वरुप आणण्यास मदत करावे़ 'मन की बात' मध्ये चंद्रपूर शहराची दखलस्वच्छता अभियानाला २०० दिवस पूर्ण झाले असता चंद्रपुरातील या श्रमदानाची दखल २९ आॅक्टोबर २०१७ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' या कार्यक्रमात घेतली होती. चंद्रपूर किल्ला स्वच्छता अभियानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला़ इको-प्रो संस्थेचे सदस्य आणि चंद्रपूर शहरातील नागरिक या मोहिमेत सहभागी झाल्याने ऐतिहासिक वारसा संवर्धनासाठी प्रेरणादायी ठरला आहे़