२९३ मुख्याध्यापकांचे होणार डिमोशन
By Admin | Updated: July 1, 2014 23:25 IST2014-07-01T23:25:24+5:302014-07-01T23:25:24+5:30
आरटीअॅक्टनुसार जिल्ह्यातील ५२८ मुख्याध्यापकांपैकी २३६ मुख्याध्यापकांचे समायोजन झाल्यानंतर आता उर्वरित तब्बल २९३ मुख्याध्यापकांची गच्छंती होणार आहे. या मुख्याध्यापकांना आता

२९३ मुख्याध्यापकांचे होणार डिमोशन
चंद्रपूर : आरटीअॅक्टनुसार जिल्ह्यातील ५२८ मुख्याध्यापकांपैकी २३६ मुख्याध्यापकांचे समायोजन झाल्यानंतर आता उर्वरित तब्बल २९३ मुख्याध्यापकांची गच्छंती होणार आहे. या मुख्याध्यापकांना आता त्याच किंवा अन्य शाळेत सहायक शिक्षक म्हणून काम करावे लागणार आहे. या नामुष्कीमुळे त्यांना कार्यरत गावात अडचण येण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषदेंंतर्गंत मुख्याध्यापकांचे ३० जुलै रोजी समायोजन करण्यात आले. यात प्रथम २३६ शिक्षकांचा समावेश करण्यात आला. यापैकी ८७ मुख्याध्यापकांना ते गावामध्ये कार्यरत होते. त्याच गावात ठेवण्यात आले. ८५ शिक्षकांना त्याच तालुक्यात पण दुसऱ्या गावात बदली करण्यात आली. तर, ६२ शिक्षकांचा तालुका बदल करण्यात आला. एका शिक्षकाचे समायोजन प्रलंबित ठेवण्यात आले.
या प्रक्रियेमुळे काही शिक्षकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले असले तरी तालुका बदल झालेल्या शिक्षकांमध्ये संतापाचे वातावरण होते.
आता उर्वरित २९३ मुख्याध्यापकांचे समायोजन करण्यात येणार आहे. मात्र यात मुख्याध्यापकांची गच्छंती होणार आहे.यापूर्वी ज्या शाळेत मुख्याध्यापक म्हणून काम करत होते. अशा मुख्याध्यापकांना आता त्याच शाळेत सहाय्यक शिक्षक म्हणून काम करण्याची नामुष्की येणार आहे. यामुळे अध्यापनाच्या कार्यात त्यांचे दुर्लक्ष होतील, असे मत काही शिक्षक व्यक्त करीत आहेत. ही नामुष्की आली असली तरी किमान ज्या शाळेत कार्यरत आहे त्या शाळेत न ठेवता दुसऱ्या शाळेत बदली करावी, अशी मागणी काही मुख्याध्यापक करीत आहेत.
जे मुख्याध्यापक पदवीधर आहे त्यांना पदवीधर शिक्षक म्हणून बढती मिळणार आहे. मात्र ज्यांच्याकडे पदवी नाही अशांची मोठी गोची होणार आहे.
सोमवारी ज्या शिक्षकांचे समायोजन कण्यात आले. त्यात काही महिला शिक्षकांचे समायोजन अन्य तालुक्यांमध्ये करण्यात आल्याने त्या मनस्ताप व्यक्त करताना दिसत होत्या. तर, ज्या शिक्षकांना सेवानिवृत्त होण्यासाठी केवळ एक ते दीड वर्ष शिल्लक आहे अशा शिक्षकांचे तालुक्याबाहेर समायोजन करण्यात आल्याने त्यांच्यात नाराजी पसरली आहे. सोमवारी पार पडलेल्या समायोजना प्रक्रियेसाठी समायोजनासाठी मुख्यकार्यपालन अधिकारी आशुषोत सलिल, उपमुख्य कायकारी अधिकारी डॉ. देशपांडे, शिक्षणाधिकारी रामदास पाटील, सर्व तालुका गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)