वीजचोरांकडून २८ हजार ९६० रुपये दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:20 IST2021-06-18T04:20:24+5:302021-06-18T04:20:24+5:30
बल्लारपूर : महावितरणने वीज चोरांविरुद्ध मोहीम सुरू केली आहे. ग्राहक वीजचोरी करताना आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून पोलिसांत गुन्हा ...

वीजचोरांकडून २८ हजार ९६० रुपये दंड वसूल
बल्लारपूर : महावितरणने वीज चोरांविरुद्ध मोहीम सुरू केली आहे. ग्राहक वीजचोरी करताना आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा महावितरणने दिला आहे. तरीही वीज चोरणाऱ्या दोन ग्राहकांना पकडून त्यांच्याकडून २८ हजार ९६० रुपये दंड व्याजासह वसूल करण्यात आला आहे.
बल्लारपूर महावितरण परिमंडळाअंतर्गत वीजचोरांना पकडण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. मीटरशी छेडछाड करणे किंवा मीटर बायपास करणे, वीजतारांवर थेट आकडे टाकून वीजचोरी करणे अशा प्रकारावर आळा घालण्यासाठी ही मोहीम सुरू असून, कारवा व सुभाष चौक टेकडी विभागातील रहिवासी ऋषी दासरवार यांच्यावर १४ हजार ७६० रुपये दंड व व्यंकटेश गणरात यांच्याकडून १४ हजार २०० रुपये दंड आकारून व्याजासह वसूल करण्यात आले आहे. सदर कारवाई उपकार्यकारी अभियंता प्रवीण तुराणकर यांनी पथकासह केली.