२६९ बेपत्ता नागरिकांच्या शोधात पोलीस
By Admin | Updated: September 15, 2014 00:01 IST2014-09-15T00:01:12+5:302014-09-15T00:01:12+5:30
मागील आठ महिन्यात जिल्ह्यात ७७३ नागरिक बेपत्ता झाले आहे. यातील ५०४ जणांना शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे. अद्यापही २६९ नागरिक बेपत्ता आहे.

२६९ बेपत्ता नागरिकांच्या शोधात पोलीस
७७३ जण बेपत्ता : ५०४ जणांना पोलिसांनी शोधले
चंद्रपूर : मागील आठ महिन्यात जिल्ह्यात ७७३ नागरिक बेपत्ता झाले आहे. यातील ५०४ जणांना शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे. अद्यापही २६९ नागरिक बेपत्ता आहे.
राज्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात नागरिक बेपत्ता होतात. काही जण घरून निघून जातात. तर काही उत्सव, कार्र्यक्रमादरम्यान बेपत्ता होतात. कुटुंबातील नागरिक शोधून थकल्यानंतर याबाबत पोलिसात तक्रार दिली जाते. स्थानिक अपराध शाखेमध्ये चालू वर्षात आठ महिन्यांमध्ये ७७३ नागरिक बेपत्ता झाल्याची नोंद आहे.
बेपत्ता होण्यामध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या अधिक आहे. १ जानेवारी ते ३१ आॅगस्टपर्यंत २८५ पुरुष, मुले तसेच ४८८ महिला, युवती बेपत्ता झाल्याची तक्रार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. यातील १६२ पुरुष तसेच ३४२ महिलांना पोलिसांनी शोधून काढले आहे. तर, १२३ पुरुष तसेच १४६ महिलांचा शोध अद्यापही पोलीस घेऊ शकले नाही.
स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे प्र्रमुख अविनाश तुराणकर यांनी सांगितले की, बेपत्ता होण्याच्या जेवढ्याही तक्रारी येतात यातील केवळ १५ टक्केच प्रकरण वास्तविक बेपत्ता होतात.
काही नागरिक विशेष करून महिला, युवती कोणालाही न सांगता घरून निघून जातात. आपल्या मर्र्जीनुसार घर सोडून जाणाऱ्या बहुतांश महिला व युवतींचा कुटुंबीयांनाच पत्ता लागतो. तरीही पोलीस त्यांना शोधण्यासाठी पुरेपूर मदत करतात.
बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिल्यानंतर संबंधित पोलीस ठाण्यातून इतर सर्व पोलीस ठाण्यात माहिती दिली जाते. बेपत्ता व्यक्तीचा फोटो शोध पत्रिका तयार करून जवळपासच्या सर्व जिल्ह्यात पाठविल्या जाते. एवढेच नाही तर, दूरदर्शन तथा अन्य प्रसार माध्यमातूनही त्यांची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला जातो. (नगर प्रतिनिधी)