जनजाती विकास समिती वाचनालयासाठी २५ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 22:54 IST2018-07-17T22:54:13+5:302018-07-17T22:54:33+5:30

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विनंतीनुसार चंद्रपुर शहरातील मूल रोड परीसरातील जनजाती विकास समितीच्या वाचनालय इमारतीच्या बांधकामासाठी राज्यसभा सदस्य खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांनी त्यांच्या खासदार विकास निधीच्या माध्यमातून सोमवारी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

25 lakhs for the library development committee | जनजाती विकास समिती वाचनालयासाठी २५ लाख

जनजाती विकास समिती वाचनालयासाठी २५ लाख

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विनंतीनुसार चंद्रपुर शहरातील मूल रोड परीसरातील जनजाती विकास समितीच्या वाचनालय इमारतीच्या बांधकामासाठी राज्यसभा सदस्य खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांनी त्यांच्या खासदार विकास निधीच्या माध्यमातून सोमवारी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
खासदार डॉ. विकास महात्मे यांनी सदर निधीच्या मंजूरीचे पत्र आज अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना सुपुर्द केले. या निधीच्या माध्यमातून जनजाती विकास समिती या संस्थेतर्फे मुल रोड परिसरात उत्तम व ग्रंथसमृध्द अशी वाचनालय इमारत उभारली जाईल. या दृष्टीने आपण स्वत: लक्ष देणार असल्याचे अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी खा. डॉ. विकास महात्मे यांना आश्वस्त केले.

Web Title: 25 lakhs for the library development committee