२२ कोरोना पॉझिटिव्ह आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:32 IST2021-01-16T04:32:11+5:302021-01-16T04:32:11+5:30
आतापर्यंत बाधितांची संख्या २२ हजार ७७८ वर पोहोचली. बरे झालेल्यांची संख्या २२ हजार ८० झाली आहे. सध्या ...

२२ कोरोना पॉझिटिव्ह आढळले
आतापर्यंत बाधितांची संख्या २२ हजार ७७८ वर पोहोचली. बरे झालेल्यांची संख्या २२ हजार ८० झाली आहे. सध्या ३१८ बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ८७ हजार ९६८ नमुन्यांची तपासणी झाली. त्यापैकी एक लाख ६३ हजार ३३५ नमुने निगेटिव्ह आले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत ३८० बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी जिल्ह्यातील ३४५, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १९, यवतमाळ १२, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे. आज बाधित आढळलेल्या २२ रुग्णांमध्ये चंद्रपूर मनपा क्षेत्रातील सात, चंद्रपूर तालूका दोन, भद्रावती चार, नागभीड एक, राजुरा एक, चिमूर, वरोरा व कोरपना प्रत्येकी दोन व इतर ठिकाणच्या एका रुग्णाचा समावेश आहे.