कोरोनाकाळात जिल्ह्यात २१४ अल्पवयीन मुलींचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:30 IST2021-09-21T04:30:49+5:302021-09-21T04:30:49+5:30

२१ व्या शतकात नवनव्या संसाधनांचा शोध लागला. त्यामुळे लहान वयातच मुलांच्या हातात अँड्राॅइड मोबाइल आले. यातील विविध ॲप्लिकेशनद्वारे देश-विदेशातील ...

214 minor girls abducted in Corona period in the district | कोरोनाकाळात जिल्ह्यात २१४ अल्पवयीन मुलींचे अपहरण

कोरोनाकाळात जिल्ह्यात २१४ अल्पवयीन मुलींचे अपहरण

२१ व्या शतकात नवनव्या संसाधनांचा शोध लागला. त्यामुळे लहान वयातच मुलांच्या हातात अँड्राॅइड मोबाइल आले. यातील विविध ॲप्लिकेशनद्वारे देश-विदेशातील मित्र-मैत्रिणींच्या संगतीत अडकले. घरातील संवाद लोप पावला. त्यातच लॉकडाऊनमुळे शाळा, महाविद्यालये बंद असल्याने मुलांना ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली मोबाइल वापरण्याची मोकळीक मिळाली. याकडे पालकांचे दुर्लक्ष झाले. याचाच फायदा घेत अनेकांनी आमिष दाखवून १८ वर्षांखालील २१४ मुलींचे व ३१ मुलांचे अपहरण जानेवारी २०२० पासून मे २०२१ या कालावधीत केल्याची नोंद जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांत दाखल आहे. मागील साडेतीन वर्षांची आकडेवारी बघितल्यास, जिल्ह्यात ५४८ मुलींचे, तर ९९ मुलांचे अपहरण झाले. त्यापैकी ४२२ मुली व ८७ मुले शोधण्यात पोलिसांना यश आले आहे.

बॉक्स

‘ऑपरेशन मुस्कान’द्वारे अनेकांचा शोध

अपहरण झालेल्या किंवा बेपत्ता झालेल्या मुला-मुलींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून दरवर्षी एक महिना ऑपरेशन मुस्कान राबविण्यात येते. त्याअंतर्गत अनेकांना शोधण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. सन २०१८ पासून मे २०२१ पर्यंत जिल्ह्यात १८ वर्षांवरील ३८७ महिला, तर १७३ पुरुष असे एकूण ५६० जण बेपत्ता झाले आहेत. यापैकी १२० पुरुषांचा, तर २७२ महिलांचा शोध लावण्यास पोलिसांना यश आले आहे.

-----

आकडेवारी ठरतेय धोक्याची

दरवर्षी मुलींच्या अपहरणाची वाढणारी आकडेवारी धोकादायक ठरत आहे. पोलीस प्रशासनाकडून जरी अशांचा काही प्रमाणात शोध लावण्यात येत असला तरी अशा मुलींचा व मुलांचा विश्वास खचला असतो. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांशी संवाद ठेवावा. एक मित्र म्हणून त्यांच्याशी वर्तणूक करावी. आपल्या मुलांचे मित्र चांगले आहेत की वाईट याबाबत पडताळणी करावी.

Web Title: 214 minor girls abducted in Corona period in the district