२०२२ पर्यंत सर्वांना पक्के घरकूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 23:18 IST2018-06-11T23:18:40+5:302018-06-11T23:18:50+5:30
देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार लोकहिताचे निर्णय घेत असून सर्वांचा विकास करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. २०२२ पर्यंत सर्वांना पक्के घरे देण्याचा सरकारचा प्रयत्न असून, प्रत्येक गावाला शुद्ध पाणी देवू, असे आश्वासन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले. ते तोहोगाव येथील समस्या निवारण सभा व कार्यकर्ता भेटीच्या कार्यक्रमात बोलत होते.

२०२२ पर्यंत सर्वांना पक्के घरकूल
लोकमत न्यूज नेटवर्क
तोहोगाव : देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार लोकहिताचे निर्णय घेत असून सर्वांचा विकास करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. २०२२ पर्यंत सर्वांना पक्के घरे देण्याचा सरकारचा प्रयत्न असून, प्रत्येक गावाला शुद्ध पाणी देवू, असे आश्वासन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले. ते तोहोगाव येथील समस्या निवारण सभा व कार्यकर्ता भेटीच्या कार्यक्रमात बोलत होते.
कार्यक्रमाला गोंडपिपरी पंचायत समितीचे सभापती दीपक सातपुते, जि.प. सदस्य वैष्णवी अमरबोडलावार, सरपंच हंसराज रागीट, उपसभापती वासमवार, महामंत्री खुशाल बोंडे, वाघुजी गेडाम, तहसीलदार सोनाली मिटकरी, संवर्ग विकास अधिकारी यशवंत मोहीतकर यांची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी ना. हंसराज अहीर यांनी थेट नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व संबंधीत अधिकाऱ्यांना त्या समस्या सोडवण्याचे आदेश दिले. तसा अहवालही सात दिवसात पाठवण्याचे आदेश दिले. यावेळी तोहोगाव ग्रामपंचायतीने १४४ गरजवंतांना घरे मंजूर करून बांधकाम प्रगतीपथावर असल्याने ना. अहीर यांनी सरपंच हंसराज रागीट यांचा गौरव केला. भाजप सरकार सिंचन, शेती, कौशल्य विकास, पर्यटन, रोजगार निर्माण करण्याचे काम मोठ्या प्रमाणात करीत आहेत. याचा अनेकांना लाभ होत असल्याचे यावेळी ना. अहीर यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश उत्तरवार यांनी केले. तर आभार हंसराज रागीट यांनी मानले.