शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

२० हजार भाविकांनी अनुभवला लोकसहभाग व आनंदाचा सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 11:21 PM

रात्रीचे १२.३० नंतर उंट, घोडा, रथ, बग्गी सोबतच महिलांचे लेझीम, टिपरी पथके. बाल, महिला व पुरुषांच्या विविध दिंड्याच्या गजरात धार्मिकतेकडे पाठ फिरविलेले आजचे युवा वर्ग दिंडीच्या तालात थिरकले.

ठळक मुद्देचंदनखेडा येथील घोडा उत्सव : दिंड्याचा गजर व सामाजिक एकोप्याचे दर्शन

आॅनलाईन लोकमतचंदनखेडा : रात्रीचे १२.३० नंतर उंट, घोडा, रथ, बग्गी सोबतच महिलांचे लेझीम, टिपरी पथके. बाल, महिला व पुरुषांच्या विविध दिंड्याच्या गजरात धार्मिकतेकडे पाठ फिरविलेले आजचे युवा वर्ग दिंडीच्या तालात थिरकले. चंदनखेडा येथील घोडा उत्सवाचा हा सोहळा गावखेड्यातून तसेच दूरवरुन आलेल्या २० हजार भाविकांनी आनंदात अनुभवला.भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा या ऐतिहासिक गावात गोंडकालीन पुरातन किल्ला आहे. येथे घोड्याची समाधी आहे. हे सर्वधर्मीय श्रद्धास्थान असून येथे गाव परीसरातील सर्वच धर्माचे लोक श्रद्धेने पुजाअर्चा करतात. घरातील कुठल्याही कार्याची सुरुवात घोड्याची पूजन करून केली जाते. २ ते ४ डिसेंबरला येथे घोडा उत्सव पार पडले.परिसर स्वच्छता, कुश स्थापना सोबतच शालेय मुलांकरिता सुंदर विचार स्पर्धा, समुह नृत्य स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, भक्तगीत स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. प्रबोधनामध्ये चिमूरचे प्रा. अशोक चरडे महाराज, सप्त खंजेरीवादक उदयपाल महाराज, मोझरीचे प्रकाश वाघ महाराज, कापसे महाराज यांचे कीर्तन व अंध बाल कलावंत चेतन उकीनकर यांचा ‘जीवनाचा मंत्र’ या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.या सोहळ्यासाठी उसळलेल्या गर्दीने गावातील मुख्य रस्ते फुलून गेले होते. रांगोळी, तोरणपताका, विद्युत रोषणाई व शुभेच्छा फलक तसेच बाहेरगावातील भक्तांकरिता नाश्ताची मोफत सेवा उपलब्ध करण्यात आली होती.महिलांना मंदिर प्रवेश तथा प्रसाद सेवनाचा समानतेचा सामाजिक अधिकार मिळाल्याने त्याही स्वंयप्रेरणेने सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या. गाव परिसरातील प्रत्येक कुटुंबातील, कधी एकत्र न आलेले नातलग, या निमित्ताने एकत्रित आले होते. महाप्रसाद वाटपाने घोडा उत्सवाचा समारोप करण्यात आला.विशेष म्हणजे, सुरक्षेची जबाबदारी पोलीस विभागासोबतच गाव परिसरातील महिला युवावर्गानी स्वयंप्रेरणेने पार पाडली. उत्सवासाठी समिती कार्यकर्ते, गावकरी तसेच भक्तांनी परिश्रम घेतले.