पोलिओच्या समूळ उच्चाटनासाठी जिल्ह्यात २ हजार ५२ लसीकरण केंद्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:40 IST2021-02-05T07:40:30+5:302021-02-05T07:40:30+5:30
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कार्डिले, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार ...

पोलिओच्या समूळ उच्चाटनासाठी जिल्ह्यात २ हजार ५२ लसीकरण केंद्रे
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कार्डिले, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम यावेळी उपस्थित होते. पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावात किमान एक याप्रमाणे २०५२ लसीकरण केंद्रे व शहरी भागात १८७, तर महानगरपालिका क्षेत्रात ३१७ अशी एकूण २ हजार ५५६ लसीकरण केंद्रे सज्ज आहेत. स्थलांतरित बालकांना व निवासाची व्यवस्था नसलेल्या बालकांना पोलिओ लस मिळावी याकरिता ८४ मोबाइल टीम ग्रामीण भागात व शहरी भागात १३ व महानगरपालिका क्षेत्रात १९ अशा ११६ मोबाइल युनिट टीमची व्यवस्था केलेली आहे. याशिवाय टोल नाका, बसस्टॉप, रेल्वेस्टेशन, यात्रास्थळे या ठिकाणीसुध्दा ट्राझिंट टीमव्दारे लसीकरणाची व्यवस्था केली आहे.
६ हजार ७१ आरोग्य कर्मचारी नियुक्त
पोलिओ लसीकरण मोहिमेकरिता ग्रमीण विभाग ४६५८ व शहरी विभागाकरिता ४६२ व चंद्रपूर मनपा क्षेत्र ९५१ असे एकूण ६०७१ कर्मचारी नियुक्त केले असून, पर्यवेक्षणाकरिता ग्रामीण विभागाकरिता ४२० व शहरी विभागाकरीता ३३ व मनपा क्षेत्र ६३ असे एकूण ५१६ पर्यवेक्षकांची नियुक्ती केली आहे. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत भारत देश संपूर्ण पोलिओ मुक्त करण्याचे केंद्र शासनाचे धोरण आहे. भारत देश लवकरात लवकर पोलिओ मुक्त व्हावा, भारतात पुढील काही वर्षांत एकही पोलिओग्रस्त रुग्ण आढळणार नाही, असे ध्येय समोर ठेवून पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.