१९० डॉक्टरांनी स्टेथोस्कोप गुंडाळला

By Admin | Updated: July 1, 2014 23:25 IST2014-07-01T23:25:04+5:302014-07-01T23:25:04+5:30

अस्थायी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवा समावेश करा, वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सेवा निवृत्तीचे वय ५८ वरून ६२ करावे, २००९-१० मध्ये सेवा समावेशन झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पूर्वलक्ष लाभ द्यावा,

190 doctors closed the stethoscope | १९० डॉक्टरांनी स्टेथोस्कोप गुंडाळला

१९० डॉक्टरांनी स्टेथोस्कोप गुंडाळला

चंद्रपूर: अस्थायी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवा समावेश करा, वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सेवा निवृत्तीचे वय ५८ वरून ६२ करावे, २००९-१० मध्ये सेवा समावेशन झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पूर्वलक्ष लाभ द्यावा, बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांचा पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावावा आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेतर्फे आंदोलन सुरु करण्यात आले. या आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी राजीनामे दिले असून जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये धरणे दिले. दरम्यान आंदोलनामुळे जिल्हातील आरोग्य यंत्रणा विस्कळीत झाली आहे.
यापूर्वी संघटनेने आंदोलन सुरु केले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र मुख्यमंत्र्यांनी आश्वासन पाळले नसल्याने संघटनेने पुन्हा आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.
मंगळवारी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत धरणे दिले. यापूर्वी २ जूनपासून संघटनेने आंदोलन पुकारले होते.
त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी संघटनेला चर्चेसाठी बोलावून १० दिवसात मागण्या सोडविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही या मागण्या पूर्ण झाल्या नाही. त्यामुळे आंदोलन सुरु करण्यात आले.
आंदोलनादरम्यान १९० वैद्यकीय अधिकाऱ्यांनी राजीनामे दिले असून ते राज्य मॅग्मो संघटनेचे अध्यक्ष व सचिव यांना पाठविण्यात आले आहे. आंदोलनामध्ये डॉ. संदीप गेडाम, डॉ. बंडू रामटेके, डॉ.प्रकाश नगराळे, डॉ.अनंता हजारे, डॉ. आनंद किन्नाके, डॉ. सुधीर मेश्राम, डॉ.सचिन उईके, डॉ.दुधपचारे, डॉ.दिगंबर मेश्राम, डॉ.उत्तम पाटील, डॉ.किशोर भट्टाचार्य व जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)

Web Title: 190 doctors closed the stethoscope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.