मूलमध्ये १७० शेळ्यांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 23:19 IST2018-05-16T23:19:49+5:302018-05-16T23:19:49+5:30
येथील कुरमार मोहल्ल्यातील पोचू बिरा कटलेलवार व इतर दोघांच्या मालकीच्या १७० शेळया व मेंढ्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना मूल येथे मंगळवारी रात्री १० वाजतादरम्यान घडली. याबाबत मूल पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मूलमध्ये १७० शेळ्यांची चोरी
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : येथील कुरमार मोहल्ल्यातील पोचू बिरा कटलेलवार व इतर दोघांच्या मालकीच्या १७० शेळया व मेंढ्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना मूल येथे मंगळवारी रात्री १० वाजतादरम्यान घडली. याबाबत मूल पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मूल तालुक्यात कुरमार समाजाचे वास्तव मोठा प्रमाणावर असून या समाजातील काही नागरिक शेळया व मेंढ्यांवर आपली उपजिविका करीत असतात. सध्या जिल्ह्यात उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढत असल्याने शेळया व मेंढ्यांना चराईसाठी शेती व जंगल परिसरात नेल्या जाते. मंगळवारी मूल येथील पोचु बिरा कटलेलवार यांच्या १२० नग, दिवाकर बिरा कटलेलवार यांचे ३८ नग तर सुखदेव बिरा कंकलवार यांचे १२ नग शेळ्या चराई करून आणल्यानंतर मूल येथील कुरमार मोहल्ल्याच्या मागील बाजुस जाळीच्या साहायाने गोलाकार बांधून त्यामध्ये मेंढ्यांना साठविले होेते. मेंढपाळ पोचु बिरा कटलेलवार हे बाजुला खाट टाकून झोपले. मेंढपाळ गाळ झोपेत असल्याची संधी सांधून अज्ञात चोरट्यांनी जाळी कापून शेळया व मेंढ्या चोरून नेल्या. सदर शेळया व मेंढ्यांची किंमत सहा लाख २० हजार रुपये आहे. चोरट्यांनी उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या शेळया व मेंढ्या चोरून नेल्याने जीवन कसे जगायचे, या विवंचनेत सदर मेंढपाळ आहे. मूल पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.