कोसंबी गवळी येथे १६ जण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:27 IST2021-04-21T04:27:58+5:302021-04-21T04:27:58+5:30
नागभीड : कोसंबी गवळी येथे दोन व्यक्तींच्या संशयास्पद मृत्यूनंतर सोमवारी विशेष कोरोना निदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ६५ ...

कोसंबी गवळी येथे १६ जण पॉझिटिव्ह
नागभीड : कोसंबी गवळी येथे दोन व्यक्तींच्या संशयास्पद मृत्यूनंतर सोमवारी विशेष कोरोना निदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ६५ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. यातील १६ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती आहे.
कोसंबी गवळी हे गाव जवळपास एक हजार लोकवस्तीचे असून या गावातील अनेक व्यक्ती ताप, सर्दी व खोकला या आजारांनी त्रस्त आहेत. त्यातच या गावातील ५० वर्षे वयोगटांतील दोन व्यक्तींचा मृत्यू झाला. या मृत्यूने गावात चांगलीच खळबळ उडाली. ही बाब त्या प्रभागाचे जि. प. सदस्य संजय गजपुरे यांचे लक्षात आल्यानंतर त्यांनी येथील तालुका वैद्यकीय अधिकारी विनोद मडावी यांच्याशी चर्चा करून कोरोना निदान विशेष शिबिर घेण्याची मागणी केली. डाॅ. मडावी यांनी वरिष्ठांची परवानगी घेऊन सोमवारी कोसंबी गवळी येथे या शिबिराचे आयोजन केले.
कोसंबी गवळी येथे आयोजित करण्यात आलेल्या या विशेष शिबिरात ६५ व्यक्तींची तपासणी करण्यात आली.या ६५ व्यक्तींपैकी १६ व्यक्ती कोरोना पाँझिटिव्ह आले असल्याची माहिती आहे. आणखी शंभरावर व्यक्ती तपासणीसाठी रांगेत होते. पण तांत्रिक कारणाअभावी त्यांची तपासणी होऊ शकली नाही. या गावात आणखी असे शिबिर घ्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.