१५३ कोरोनाबाधित उपचारांखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:20 IST2021-07-15T04:20:47+5:302021-07-15T04:20:47+5:30
बाधित आढळलेल्या १७ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील ४, चंद्रपूर तालुका १, बल्लारपूर १, भद्रावती ४, ब्रह्मपुरी ३, वरोरा १, ...

१५३ कोरोनाबाधित उपचारांखाली
बाधित आढळलेल्या १७ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील ४, चंद्रपूर तालुका १, बल्लारपूर १, भद्रावती ४, ब्रह्मपुरी ३, वरोरा १, कोरपना २ व मूल तालुक्यातील एकाचा समावेश आहे. नागभीड, सिंदेवाही, सावली, पोंभूर्णा, गोंडपिपरी, राजूरा, चिमूर, जिवती तालुक्यांत एकही रुग्ण आढळला नाही. एकूण बाधितांची संख्या ८४ हजार ८६४ वर पोहोचली आहे. सुरुवातीपासून बरे झालेल्यांची संख्या ८३ हजार १७९ झाली आहे. सध्या १५३ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ५ लाख ८५ हजार ३५८ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४ लाख ९६ हजार ७५७ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात १५३३ बाधितांचे मृत्यू झाले आहे. नागरिकांनी कोरोना पूर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे, मास्क वापरावा, स्वत:ची काळजी घ्यावी, पात्र नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.