१५११ नवे पॉझिटिव्ह; ३४ बाधितांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:28 IST2021-04-24T04:28:42+5:302021-04-24T04:28:42+5:30
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ४९ हजार ४९४ वर पोहोचली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ३४ हजार ...

१५११ नवे पॉझिटिव्ह; ३४ बाधितांचा मृत्यू
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ४९ हजार ४९४ वर पोहोचली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ३४ हजार ५७९ झाली आहे. सध्या १४ हजार १८२ बाधितांवर उपचार सुरू आहेत. ३ लाख ४९ हजार ३६ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २ लाख ९२ हजार ६३२ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ७३३ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ६७७, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली २५, यवतमाळ २२, भंडारा पाच, गोंदिया एक आणि वर्धा एक, नागपूर येथील एका बाधिताचा समावेश आहे.
असे आहेत मृतक -
चंद्रपूर शहरातील गजानन महाराज चौक परिसरातील ७२ वर्षीय पुरुष, ५४ वर्षीय पुरुष, हवेली गार्डन येथील ५१ वर्षीय पुरुष, दुर्गापूर येथील ५७ वर्षीय महिला, ६० व ६५ वर्षीय पुरुष, महाकाली वार्ड येथील ३५ वर्षीय पुरुष, ५५ वर्षीय पुरुष, ९२ वर्षीय महिला, भद्रावती तालुक्यातील गुरुदेव नगर येथील ८३ वर्षीय पुरुष, बल्लारपूर तालुक्यातील ४८ वर्षीय पुरुष, राजुरा तालुक्यातील ४८ व ६० वर्षीय पुरुष, गोंडपिपरी तालुक्यातील ७५ वर्षीय पुरुष, नागभीड तालुक्यातील ४४ वर्षीय व ५४ वर्षीय महिला, वरोरा तालुक्यातील ६५ व ५५ वर्षीय पुरुष, कोरपना तालुक्यातील ६८ वर्षीय पुरुष, गडचांदूर येथील ६२ वर्षीय पुरुष, वणी तालुक्यातील ५२ वर्षीय पुरुष, चिमूर तालुक्यातील टेकेपार येथील ६५ वर्षीय पुरुष, ५५ वर्षीय महिला, पिंपळनेरी येथील ६५ वर्षीय महिला, ब्रह्मपुरी तालुक्यातील ४३ वर्षीय महिला, ७० व ७३ वर्षीय पुरुष भंडारा येथील ४२ वर्षीय पुरुष, तर नागपूर जिल्ह्यातील कोराडी येथील ३६ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
तालुकानिहाय पॉझिटिव्ह
चंद्रपूर मनपा क्षेत्र ४१२, चंद्रपूर ४५, बल्लारपूर १५८
भद्रावती १३८, ब्रह्मपुरी ७०, नागभीड २६, सिंदेवाही ९२
मूल ८०, सावली ३०, पोंभूर्णा १०, गोंडपिपरी ३४, राजुरा ६१, चिमूर १४३, वरोरा ११८, कोरपना ५४ जिवती २७ व अन्य ठिकाणी १७ रुग्ण असे एकूण १५११ पॉझिटिव्ह आढळले आहेत.