मालगुजारी तलावांच्या नूतनीकरणासाठी १५० कोटी
By Admin | Updated: March 12, 2017 01:25 IST2017-03-12T01:25:29+5:302017-03-12T01:25:29+5:30
सिंचन वाढविण्यासाठी मालगुजारी तलावाचे नूतनीकरण केले जात आहे. त्यासाठी १५० कोटी रुपये आपण देतो आहे.

मालगुजारी तलावांच्या नूतनीकरणासाठी १५० कोटी
सुधीर मुनगंटीवार : कृषी भवनाचे उद्घाटन
चंद्र्रपूर : सिंचन वाढविण्यासाठी मालगुजारी तलावाचे नूतनीकरण केले जात आहे. त्यासाठी १५० कोटी रुपये आपण देतो आहे. शेतकऱ्यांसाठी तरतूद करताना कुठेही आखडता हात घेतला जाणार नाही. शेतकरी समृध्द झाला पाहिजे, ही शासनाची भूमिका आहे. उदघाटन झालेले कृषी भवन शेतकऱ्यांच्या क्रांतीचे मंदिर व्हावे, असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले
कृषी भवनाच्या नवीन इमारतीचे लोर्कापण पालकमंत्री ना. मुनगंटीवार यांच्या करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यमक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर होते. तर प्रमुख पाहुणे आमदार नाना शामकुळे, आ. अॅड.संजय धोटे, महापौर राखी कंचलार्वार, उपमहौपार वसंता देशमुख, प्रभारी जिल्हाधिकारी संजय धिवरे, बांधकामचे अधिक्षक अभियंता डी.के.बालपांडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. ए. आर. हसनाबादे आदी उपस्थित होते.
ना. मुनगंटीवार म्हणाले की, शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्यास तो स्वत:च्या बळावर आर्थिक क्रांती घडवू शकतो. त्यामुळे सिंचन सुविधा पुरविणाऱ्या कोणत्याही बाबींची आर्थिक कपात केली नाही, असे त्यांनी यावेळी दिली.
अर्धवट सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यावर भर असून २०२२ मध्ये नव्हे तर २०२१ पर्यंतच जिल्हयाचे कृषी उत्पादन दुप्पट करु. विषमुक्त शेतीचा प्रयत्न करु. त्यासाठी नवीन कृषी भवन शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीची इमारत बनली पाहिजे. कृषि भवनास वालकंपाऊड व इतर कामासाठी जिल्हा नियोजनमधून निधी उपलब्ध करुन देवू, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी आ.नाना शामकुळे यांचेही भाषण झाले. प्रस्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. हसनाबादे यांनी केले. प्रारंभी फीत कापून इमारतीचे उद्घाटन केले. (प्रतिनिधी)
शेतकऱ्यांच्या विकासासाठी कार्यक्रम राबवा -अहीर
केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर म्हणाले की, केंद्र व राज्य शासन शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवित आहे. या योजनांचा शेतकऱ्यांच्या विविकासाठी सकारात्मक दृष्टीने पाठपुरावा करुन राबवा, पंतप्रधान सिंचन योजना केंद्राची महत्वाकांक्षी योजना असून ती उत्तमपणे राबविली गेली पाहिजे. युरियाचे भाव वाढविणार नाही, असा संकल्प शासनाने केला होता. गेले तिन वर्षदर वाढविले नाही. पुढेही वाढणार नाही. बीटी बियाने, मिश्र खते, डीएपी या खतांचेही भाव कमी केले असल्याचे ना. अहीर यांनी सांगितले.