शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
2
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
3
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
4
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
5
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
6
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
7
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
8
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
9
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
11
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
12
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
13
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
14
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
17
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
18
"दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
19
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

१४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 05:00 IST

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस स्टेशन रामनगर परिसरात पेट्रोलिंग करीत असताना पडोली ते चंद्रपूरकडे येणाऱ्या चारचाकी वाहनातून दारूची वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी वरोरा नाका चौकात नाकाबंदी करुन वाहनास थांबविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी बघून वाहनचालकाने वाहन भरधाव वेगाने पळविले.

ठळक मुद्देस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : एकाला अटक, पाठलाग करुन केली कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी फिल्मी स्टाईल वाहनाचा पाठलाग करुन १४ लाख २३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाई प्रिदर्शिनी चौकात करण्यात आली. या कारवाईत एकाला अटक करण्यात आली. शेख वसिम शेख शहाबुद्दीन (२८) रा. आनंदनगर वर्धा असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस स्टेशन रामनगर परिसरात पेट्रोलिंग करीत असताना पडोली ते चंद्रपूरकडे येणाऱ्या चारचाकी वाहनातून दारूची वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी वरोरा नाका चौकात नाकाबंदी करुन वाहनास थांबविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी बघून वाहनचालकाने वाहन भरधाव वेगाने पळविले. पोलिसांनी वाहनाचा पाठलाग करून वाहनास प्रियदर्शिनी चौकात ताब्यात घेतले. या कारवाईत १४ लाख २३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांचे नेतृत्वात बोबाडे, संगीडवार, अमजद, संदीप मुळे, प्रशांत नागोसे, विनोद जाधव आदींनी केली.आठवडाभरातील दुसरी कारवाईस्थानिक गुन्हे शाखेने भिवापूर ते नागभीड मार्गावर शुक्रवारी एम एच ४० बीपी ५१९४ या क्रमांकाच्या वाहनातून २०० पेट्या देशी दारु व सहा पेट्या बियर दारुसाठ ट्रक असा एकूण ३७ लाख ३० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली होती. एकाच आठवड्यात दोन मोठ्या कारवाया केल्याने दारुविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.बल्लारपुरात आठ लाख ४० हजारांची दारू जप्तबल्लारपूर : येथील कॉलरी भागात बल्लारपूर पोलिसांनी आठ लाख ४० हजार रुपये किंमतीची देशी दारू सोमवारी मध्य रात्री केली. याप्रकरणी पोलिसांनी अनवर अब्बास शेख, सागर बांबोडे यांना अटक करुन अन्य एकाजणाविरुद्ध गुन्हा दाखल केला. सदर कारवाई ठाणेदार एस. एस. भगत यांच्या मार्गदर्शनात एपीआय गायकवाड, हवालदार सुनील कांबळे, पिदुरकर, वरघणे आदींनी केली

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी