१४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 05:00 IST2019-12-17T05:00:00+5:302019-12-17T05:00:43+5:30

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस स्टेशन रामनगर परिसरात पेट्रोलिंग करीत असताना पडोली ते चंद्रपूरकडे येणाऱ्या चारचाकी वाहनातून दारूची वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी वरोरा नाका चौकात नाकाबंदी करुन वाहनास थांबविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी बघून वाहनचालकाने वाहन भरधाव वेगाने पळविले.

14 lakh rupees issue seized | १४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

१४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

ठळक मुद्देस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : एकाला अटक, पाठलाग करुन केली कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी फिल्मी स्टाईल वाहनाचा पाठलाग करुन १४ लाख २३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाई प्रिदर्शिनी चौकात करण्यात आली. या कारवाईत एकाला अटक करण्यात आली. शेख वसिम शेख शहाबुद्दीन (२८) रा. आनंदनगर वर्धा असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस स्टेशन रामनगर परिसरात पेट्रोलिंग करीत असताना पडोली ते चंद्रपूरकडे येणाऱ्या चारचाकी वाहनातून दारूची वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी वरोरा नाका चौकात नाकाबंदी करुन वाहनास थांबविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी बघून वाहनचालकाने वाहन भरधाव वेगाने पळविले. पोलिसांनी वाहनाचा पाठलाग करून वाहनास प्रियदर्शिनी चौकात ताब्यात घेतले. या कारवाईत १४ लाख २३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांचे नेतृत्वात बोबाडे, संगीडवार, अमजद, संदीप मुळे, प्रशांत नागोसे, विनोद जाधव आदींनी केली.

आठवडाभरातील दुसरी कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेने भिवापूर ते नागभीड मार्गावर शुक्रवारी एम एच ४० बीपी ५१९४ या क्रमांकाच्या वाहनातून २०० पेट्या देशी दारु व सहा पेट्या बियर दारुसाठ ट्रक असा एकूण ३७ लाख ३० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली होती. एकाच आठवड्यात दोन मोठ्या कारवाया केल्याने दारुविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.
बल्लारपुरात आठ लाख ४० हजारांची दारू जप्त
बल्लारपूर : येथील कॉलरी भागात बल्लारपूर पोलिसांनी आठ लाख ४० हजार रुपये किंमतीची देशी दारू सोमवारी मध्य रात्री केली. याप्रकरणी पोलिसांनी अनवर अब्बास शेख, सागर बांबोडे यांना अटक करुन अन्य एकाजणाविरुद्ध गुन्हा दाखल केला. सदर कारवाई ठाणेदार एस. एस. भगत यांच्या मार्गदर्शनात एपीआय गायकवाड, हवालदार सुनील कांबळे, पिदुरकर, वरघणे आदींनी केली

Web Title: 14 lakh rupees issue seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.