१३ मॉडेलची राज्यस्तरावर निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 22:51 IST2018-01-17T22:50:15+5:302018-01-17T22:51:19+5:30

प्रादेशिक विद्या प्राधिकरण, राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर, जिल्हा परिषद शिक्षण विभाग चंद्रपूर आणि भवानजीभाई चव्हाण हायस्कूलच्या संयुक्त विद्यमाने ‘शाश्वत विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम’ या विषयावर ४३ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन स्थानिक भवानजीभाई चव्हाण हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे पार पडले.

13 models selected at the state level | १३ मॉडेलची राज्यस्तरावर निवड

१३ मॉडेलची राज्यस्तरावर निवड

ठळक मुद्देजिल्हा विज्ञान प्रदर्शनाचा समारोप : १९५ प्रतिकृतींचा सहभाग

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : प्रादेशिक विद्या प्राधिकरण, राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर, जिल्हा परिषद शिक्षण विभाग चंद्रपूर आणि भवानजीभाई चव्हाण हायस्कूलच्या संयुक्त विद्यमाने ‘शाश्वत विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम’ या विषयावर ४३ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन स्थानिक भवानजीभाई चव्हाण हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे पार पडले. या प्रदर्शनात सहभागी १९५ प्रतिकृतीपैकी १३ प्रतिकृतींची राज्यस्तरावर निवड करण्यात आली आहे.
तीन दिवसीय प्रदर्शनाचा बुधवारी समारोप झाला. जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते निवड झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण, क्रीडा, आरोग्य समिती सभापती कृष्णा सहारे होते. प्रमुख अतिथी म्हणून आ. नागो गाणार, समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, शिक्षण समिती सदस्य नितू चौधरी, प्राचार्य धनंजय चाफले, डॉ प्रशांत ठाकरे, प्रकाश रहांगडाले, शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर, संस्थेचे सचिव केशवराव जेणेकर, शाळेचे मुख्याध्यापक महेशकर उपस्थित होते.
विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून वैज्ञानिक तयार व्हावे, विद्यार्थ्यांनी संशोधनात्मक मॉडेल्स तयार करावे, वैज्ञानिक तयार होऊन जिल्ह्याचे नाव उज्वल करावे, असे आवाहन मान्यवरांनी केले. प्रास्ताविकातून शिक्षणाधिकारी डोर्लीकर यांनी अहवाल वाचन केले. संचालन प्रिती बलकी यांनी तर आभार राहागडाले यांनी मानले. कार्यक्रमादरम्यान मागील वर्षी राष्ट्रीय स्तरावर मॉडेल नेणारे अशोक भगत यांचा सत्कार करण्यात आला. प्रदर्शनाचे परीक्षक म्हणून डॉ. प्रशांत ठाकरे, प्रमोद निखाडे, गणेश जामनकर, अमोल काकडे, सतीश खोब्रागडे आणि संदिप कासवटे यांनी काम पाहिले. प्रदर्शनाला विविध शाळांमधील जवळपास पाच हजार विद्यार्थ्यांनी भेट दिली.
निवड झालेल्या प्रतिकृती
उच्च प्राथमिक गट ( बिगर आदिवासी)

ख्रिस्तानंद स्कूल अ‍ॅड ज्युनिअर कॉलेज, ब्रम्हपुरीचा तनिष्क दुलारी गाढवे प्रथम, बाल विकास प्राथमिक शाळा, मूलची मृणाली गोपाल बलेवार द्वितीय, तर जि.प. प्राथमिक शाळा, कापसीचा वैभव संतोष कोसरे हा याची प्रतिकृती तृतीय ठरली. आदिवासी गटात जि.प. प्राथमिक शाळा, चेकलिखितवाडा येथील वैष्णवी नरेश बांगरे हिच्या प्रतिकृतीची निवड झाली.
माध्यमिक/उच्च माध्यमिक गट (बिगर आदिवासी गट)
ख्रिस्तानंद स्कूल अ‍ॅड ज्युनिअर कॉलेज, ब्रम्हपुरीचा विक्रांत भाउराव कुथे प्रथम, सेंट क्लारेंट इंग्लिश मीडियम स्कूल चिमूरची सानिक संजय साखरकर द्वितीय, तर मायक्रोन न्यु सायन्स कॉलेज चंद्रपूरचा ऋषिकेश बळीराम पवार याची प्रतिकृती तृतीय ठरली. आदिवासी गटात विवेकानंद विद्यालय बेंबाळचा गणेश रमेश सुरतीकर याच्या प्रतिकृतीची निवड झाली.
प्राथमिक शिक्षक गट (शैक्षणिक साहित्य)
जि.प. उच्च प्रस्थामिक शाळा टेंभुरवाहीचे बाबा देवराव कोडापे, माध्यमिक-उच्च माध्यमिक गटात आॅर्डन्स फॅक्टरी हायर सेंकडरी स्कूल भद्रावतीचे सुरेश कुमार भगत, लोकसंख्या शिक्षण गटात जनता विद्यालय, गोंडपिंपरीचे वेणूधर महादेव सोनटक्के, माध्यमिक-उच्च मध्यमिक गटात जनता विद्यालय, ताडाळीच्या विना एस. भगत, प्रयोगशाळा परिचर-सहायक गटात लोक विद्यालय चालबर्डीचे गणेश प्रभाकर बदखल यांच्या प्रतिकृतीची निवड करण्यात आली.

Web Title: 13 models selected at the state level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.