१२ तासांचा बिबट-मानव संघर्ष

By Admin | Updated: May 20, 2017 01:18 IST2017-05-20T01:18:44+5:302017-05-20T01:18:44+5:30

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या हाकेवर असलेल्या मानेमोहाडी संघर्ष त गावा-शेजारी बिबट्याने पाच लोकांना जखमी केले होते.

12-hour leopard-human conflict | १२ तासांचा बिबट-मानव संघर्ष

१२ तासांचा बिबट-मानव संघर्ष

मानेमोहाडी येथील थरार : हिंस्त्रपशुंच्या हल्ल्यांमध्ये वाढ
राजकुमार चुनारकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या हाकेवर असलेल्या मानेमोहाडी संघर्ष त गावा-शेजारी बिबट्याने पाच लोकांना जखमी केले होते. या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने रेसक्यू आॅपरेशन राबविले. त्या मोहिमेमध्ये बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले असले तरी, बिबट मानवाचा तब्बल बारा तासाचा थरार अनेकांनी अनुभवला.
सूर्य आग ओकत असल्याने तापमानाने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे जंगलातील वन्य प्राण्यांचे पाण्याचे पाणवठे कोरडे पडले आहेत. त्यामुळे जंगलातील वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावाशेजारी येत आहेत. त्यामुळे जंगलव्याप्त गावात हिंस्त्र पशुच्या हल्ल्याचा घटनेत वाढ होत आहे. नुकतेच ताडोबा येथील आग्निरक्षकाला ठार मारण्याची घटना झाली. तर अस्वलाच्या हल्ल्यात चार तेदुपत्ता मजुरांना जीव गममावा लागला. या घटनामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत वन्यप्राणी व मानवाचा संघर्ष वाढला असल्याचे चित्र जंगलपरिसराचा गावात निर्मााण झाले आहे.
मानव जीव साखळीत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जंगलात वाघ असणे गरजेचे आहे. त्यामुळे वनविभागाकडून वाघाचे रक्षण करण्यात येत आहे.तसेच नागरिक सरपणासाठी व इतर कामासाठी जंगलात जाऊ नये म्हणून गॅस सिंलेडरचे वाटप करण्यात येत आहे.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या मोठया प्रमाणात आहे. ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या लगत असलेल्या मानेमोहाळी या गावातील शेतकरी बकरी चारत असतांना सकाळी ९ वाजताच्या सुमारास बिबट्याने हल्ला करुन तीन लोकांना गंभीर जखमी केले. त्यामध्ये गिरीधर मुंडरे, विकास जिवतोडे, दवलत धाडसे, राजु चौधरी, अमोल ठेकेदार या पांच जणांनावर बिबटयाने हमला केला आहे. त्यामुळे बिबट व मानवाच्या संघर्षाचा थरार सकाळी १० ते रात्री १० असा तब्बल १२ तास उपस्थित नागरिकांनी अनुभवला.
या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे डीसीएफ केवल सिंह याच्या नेतृत्वात आरएफ ओ निवंडे, सोनट्टके तर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविण परदेशी यांच्या नेतृत्वात रेस्क्यु आॅपरेशन राबविण्यात आले. तर आमदार किर्तीकुमार भांगडिया हेसुध्दा घटना स्थळावर तळ ठोकून बसले होते. अखेर रात्री ९ वाजताच्या दरम्यान या बिबट मानवसंघर्षाच्या थराराचा शेवट बिबट्याला जेरबंद करण्यात झाला.

फोटोचा मोह बेतला
असता जीवावर
मानेमोहाडी शेत शिवरात पुलामध्ये असलेल्या बिबट्याला पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी गर्दी केली होती. त्यामधील अनेकांना जवळ जावून बिबट्याचा फ ोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही. मात्र यावेळी बिबटाने चक्क बाहेर निघून हल्ला केला. त्यामध्ये अमोल सर व राजु चौधरी जखमी झाले.
विदेशी पर्यटकांनीही अनुभवला थरार
वाघ पाहण्यासाठी ताडोबामध्ये विदेशी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मानेमोहाडी येथे मानव-बिबट्यामध्ये झालेला बारा तासांचा संघर्ष संयुक्त राट्रातील रहिवासी असलेल्या सरिता खानविलकर या विदेशी पर्यटन महिलेनी अनुभवला व हा प्रसंग आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. याबाबत प्रतिनिधीने विचारले असता, हा प्रसंग जीवनातील अद्भूत प्रसंग असल्याचे सांगितले. तसेच आपण याठिकाणी चौथ्यांदा अलो असून वन्य प्राण्यांवर व वनांवर अभ्यास करत असल्याचे सांगितले.
शाबीरने वाचविले शिपायाचे प्राण
नागरीकांच्या सुरक्षेसाठी व सुव्यवस्थेसाठी घटना स्थळावर आलेले शिपाई किशोर बोढे यांच्यावर अचानक बिबट्याने हल्ला केला. मात्र यावेळी शाबीर पठाण याने बिबट्याच्या तोंडात बाबूंची काडी टाकून शिपाई कशोर बोढे यांची बिबट्याच्या तावडीतून सुटका केली.
महिलांचीही अलोट गर्दी
गावा शेजारी बिबट असल्याची वार्ता गावात पसरताच घटनास्थळावर वृध्द व महिलांनी मोठी गर्दी केली होती.
आमदाराने केले नागरिकांना शांत
वाघ पाहण्यासाठी पंचकोशीतील हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. गर्दीला पागंवण्यासाठी पोलीस व वनविभागाचे कर्मचारी कायर् करीत होते. मात्र नागरिक त्यांचे ऐकत नव्हते. ही स्थिती पाहून आ. किर्तीकुमार भांगडीया यांनी घटनास्थळावरुन मागे व्हा व रेसक्यू आॅपरेशनसाठी मदतीचे आवाहन केले.

 

Web Title: 12-hour leopard-human conflict

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.