११ लाखांचा दारूसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 22:37 IST2019-02-17T22:37:24+5:302019-02-17T22:37:40+5:30

वाहनाने दारू वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती बल्लारपूर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी विसापूर येथे सापळा रचून ११ लाख १० हजार रूपयांची देशी दारू व ६० हजार रूपये किमंतीचे वाहन असा एकूण ११ लाख ७० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवारी करण्यात आली.

11 lakhs of liquor seized | ११ लाखांचा दारूसाठा जप्त

११ लाखांचा दारूसाठा जप्त

ठळक मुद्देबल्लारपूर पोलिसांची कारवाई : अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले

लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : वाहनाने दारू वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती बल्लारपूर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी विसापूर येथे सापळा रचून ११ लाख १० हजार रूपयांची देशी दारू व ६० हजार रूपये किमंतीचे वाहन असा एकूण ११ लाख ७० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवारी करण्यात आली.
बल्लारपूर पोलीस ठाण्याअंतर्गत विसापूर येथील जुन्या वस्तीच्या गल्लीत मोठ्या प्रमाणात दारूसाठा साठवून असून त्याची वाहतूक होणार असल्याची माहिती बल्लारपूर पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी सापडा रचून १११ पेट्या देशी दारूसोबत सुझुकी मोपेट दुचाकी वाहन असा एकूण ११ लाख १० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. परंतु, कारवाई दरम्यान आरोपी फरार झाले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक गोपाल भारती, सहायक पोलीस निरीक्षक संदीप धोबे, पोलीस उपनिरीक्षक संतोष जाधव, राजेंद्र खनके, मनोज पिदुरकर, जीवन पाल, प्रशांत निमगळे, दिलीप आदे आदींनी केली.

Web Title: 11 lakhs of liquor seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.