पाठलाग करून ११ लाखांचा दारूसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 05:00 IST2020-07-19T05:00:00+5:302020-07-19T05:00:31+5:30
शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास नवरगाव-उमरवाही मार्गावर करण्यात आली. या कारवाईत चार जणांना अटक करण्यात आली. एका महिन्यातील पाचवी कारवाई असल्याने दारुविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. नवरगाव-उमरवाही मार्गाने मूलकडे दारुची वाहतूक होत असल्याची माहिती सिंदेवाही पोलिसांना मिळाली.

पाठलाग करून ११ लाखांचा दारूसाठा जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदेवाही : चारचाकी वाहनाचा पाठलाग करुन सिंदेवाही पोलिसांनी देशी विदेशी दारुच्या ३० पेट्या दारु जप्त केली. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास नवरगाव-उमरवाही मार्गावर करण्यात आली. या कारवाईत चार जणांना अटक करण्यात आली. एका महिन्यातील पाचवी कारवाई असल्याने दारुविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
नवरगाव-उमरवाही मार्गाने मूलकडे दारुची वाहतूक होत असल्याची माहिती सिंदेवाही पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर ठाणेदार निशिकांत रामटेके यांच्या नेतृत्वात सापळा रचून नाकाबंदी करण्यात आली. यावेळी फोर्ड कंपनीचे वाहनाचा पाठलाग करुन वाहनातून २० पेट्या दारु, १० पेटी देशी दारु असा एकूण तीन लाख रुपये किंमतीची दारु व वाहन असा एकूण ११ लाख रुपयांचा दारुसाठा जप्त केला. चारही आरोपींवर कलम ६५, ८३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ठाणेदार निशिकांत रामटेके यांच्या मार्गदर्शनात देवा सोनुले, राहुल राहते, कपील भोयर यांनी केली. सिंदेवाही पोलिसांची महिनाभरातील पाचवी कारवाई आहे.