मंगीतील ११ कुटुंब जगताहेत बहिष्कृत जीणे !
By Admin | Updated: August 11, 2014 23:50 IST2014-08-11T23:50:10+5:302014-08-11T23:50:10+5:30
देश स्वतंत्र होऊन ६८ वर्ष लोटले. मात्र मात्र पारतंत्र्यांची बेडी अद्याप अनेकांच्या हातात कायम असल्याचे दिसते. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील मंगी या छोट्याशा गावामध्ये ९० आदिवासी

मंगीतील ११ कुटुंब जगताहेत बहिष्कृत जीणे !
राजुरा : देश स्वतंत्र होऊन ६८ वर्ष लोटले. मात्र मात्र पारतंत्र्यांची बेडी अद्याप अनेकांच्या हातात कायम असल्याचे दिसते. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील मंगी या छोट्याशा गावामध्ये ९० आदिवासी कुटुंबापैकी अकरा आदिवासी कुटुंबावर त्याच गावातील गावपाटलांनी टाकलेल्या सामाजिक बहिष्कारामुळे मागील अनेक वर्षांपासून मंगीतील अकरा आदिवासी कुटुंब बहिष्कृत जिणे जगत आहेत.
गावातून बहिष्कृत असलेल्या या ११ कुटुंबातील सर्व व्यक्तींना कोणत्याही सामाजिक व धार्मीक उत्सवात सहभागी होता येत नाही. त्यांना या गावामध्ये इतर कोणत्याही कार्यक्रमात तर सहभागी होताच येत नाही, सोबतच त्यांना कोणत्याही समाजातील व्यक्तीसोबत व्यवहार करण्यास बंदी टाकली आहे. या गावातील गावपंचायतीचा प्रभाव आजही या ठिकाणी दिसत असून क्षुल्लक कारणावरून या गावातील कारभाऱ्यानी या अकरा कुटुंबाचे जीवन उद्धवस्त करणाऱ्याचा निर्णय घेतला आहे.
यावरील बंदी उठवण्याचा योग्य प्रयत्न एकाही अधिकारी व राजकीय नेत्यानी चालविला नाही. त्यामुळे अनेक वर्षापासून येथील अकरा कुटुंब अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहे. या मंगी गावातील मुलगी लिला हिने बंडू सिडाम या युवकासोबत प्रेमविवाह केला. हाच मुद्दा पुढे करून या मुलीच्या भावावर गावपाटलांनी सामाजिक बहिष्कार टाकला.
आदिवासी समाज सन्मानाने गापाटलाची नियुक्ती करतो. त्याच्या जोडीला चार कारभारी दिले जातात. बहिष्कृत करणाऱ्या या क्रूर प्रथेला काही जणांनी विरोध दर्शविला. मात्र गावपाटील व त्यांच्या कारभाऱ्यांनी त्यांनाही बहिष्कृत केले आहे. राजुरा तालुक्यातील मंगी या गावातील हे बहिष्कृत ११ कुटुंब एकविसाव्या शतकातही अत्यंत कठीण परिस्थितीत जीवन जगत असून शासन कितीही योजना आदिवासीसाठी कार्यान्वित केल्या तरी एका दशकापासून त्यांना याचा लाभ मिळत नाही आहे, ही दुर्देवाची बाब आहे.
शासनाने आतातरी या गावामध्ये जाऊन योग्य समन्वय घडवून आणावा, असा मानस व्यक्त होत आहे. (शहर प्रतिनिधी)