१०० विद्यार्थ्यांकडे सारख्याच कॉपी!
By Admin | Updated: February 25, 2016 00:53 IST2016-02-25T00:53:02+5:302016-02-25T00:53:02+5:30
येथील एका कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षिकेने एक नाही, दोन नाही तर तब्बल १०० विद्यार्थ्यांना बारावीच्या भौतिकशास्त्र पेपरच्या कॉपी पोहोचविल्याच्या चर्चेला गडचांदुरात उधाण आले आहे.

१०० विद्यार्थ्यांकडे सारख्याच कॉपी!
पेपर फुटल्याची चर्चा : विद्यार्थ्यांकडून घेतले प्रत्येकी २०० रुपये
गडचांदूर : येथील एका कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षिकेने एक नाही, दोन नाही तर तब्बल १०० विद्यार्थ्यांना बारावीच्या भौतिकशास्त्र पेपरच्या कॉपी पोहोचविल्याच्या चर्चेला गडचांदुरात उधाण आले आहे. विशेष म्हणजे, प्रति विद्यार्थी २०० रुपये घेऊन बहुपर्यायी प्रश्नांची उत्तरे दिल्याचे केंद्रावरील अनेक विद्यार्थ्यांनी उघडपणे सांगितले.
येथील एका विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालय (विज्ञान) या शाखेत अध्यापन करणारी शिक्षिका आहे. भौतिकशास्त्र हा बारावी विज्ञानच्या विद्यार्थ्यांसाठी कठीण पेपर असतो. सर्वच विद्यार्थी या पेपरचा धसका घेऊन असतात. मात्र स्वत:च्या ट्युशन बॅचमधील विद्यार्थ्यांना बहुपर्यायी प्रश्नांची उत्तरे देऊन या शिक्षिकेने विद्यार्थ्यांना पास करण्यात कमालीची मदत केली. वास्तविक पाहता विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर १०.३० वाजता पोहोचणे बंधनकारक असते. इंग्रजी व मराठी या विषयाला वेळेवर येणाऱ्या विद्यार्थ्यांनी भौतिकशास्त्र या विषयाच्या वेळी थेट ११ वाजता तर काहींनी ११ नंतर परीक्षा केंद्रावर ‘एन्ट्री’ केली. सदर घटनेची पूर्वीच परीक्षा केंद्रावर चर्चा झाल्याने परीक्षा नियंत्रक व पर्यवेक्षकांनी सदर विद्यार्थ्यांची झडती घेतली असता विद्यार्थ्यांनी ठिकठिकाणी प्रश्नाच्या क्रमांकासह उत्तरे लिहून आणली होती. एका विद्यार्थ्यांने तर संपूर्ण शर्टवर उत्तरे उतरविली होती. त्याला ते शर्ट काढून दुसरे शर्ट घालून देण्यात आले. (शहर प्रतिनिधी)