विधानसभा क्षेत्रातील विकासकामांना १ कोटी ९७ लाख रुपयांची मंजुरी

By Admin | Updated: August 16, 2014 23:24 IST2014-08-16T23:24:02+5:302014-08-16T23:24:02+5:30

राज्यातील गावांतर्गत मुलभूत सुविधांच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासनाकडे सातत्याने केलेल्या मागणीमुळे सन २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या

1 crore 97 lakh sanctioned for development works in assembly constituencies | विधानसभा क्षेत्रातील विकासकामांना १ कोटी ९७ लाख रुपयांची मंजुरी

विधानसभा क्षेत्रातील विकासकामांना १ कोटी ९७ लाख रुपयांची मंजुरी

चंद्रपूर : राज्यातील गावांतर्गत मुलभूत सुविधांच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासनाकडे सातत्याने केलेल्या मागणीमुळे सन २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावाअंतर्गत रस्ते व अन्य सुविधांसाठी ग्रामविकास विभागाने १ कोटी ९७ लक्ष रुपयांच्या निधीला राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये नुकतीच प्रशासकीय मान्यता दिली आहे. शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नांंना यश मिळाले. यामुळे ग्रामीण भागातील विकासकामांना गती मिळणार आहे. गावांचा विकास हाच माझा ध्यास आल्याचे ते म्हणाले.
ग्रामविकास योजनेंंतर्गत ग्रामीण भागातील रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामासाठी ग्रामविकास विभागाने १२ आॅगस्ट २०१४ ला जिवती तालुक्यातील मौजा हिरापूर ग्राम पंचायत खडकी येथे अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे ५ लाख, मौजा आसापूर ग्राम पंचायत अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याने बांधकाम करणे ५ लाख, मरकागोंदी सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे ५ लाख, जिवती ग्राम पंचायत अंतर्गत अंतर्गत श्री प्रल्हाद मदणे यांच्या घराजवळील अंतर्गत रस्ता बांधकाम करणे ५ लाख, येरवा येथे सिमेंट रस्ता करणे ५ लाख, मौजा धामनगाव येथे नामदेव नागापुरे यांच्या घरापासून मेन रोड सिमेंट काँक्रीेट रस्त्याचे बांधकाम करणे १० लाख, येरमी येसापूर येथील अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे ५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे.
गोंडपिंपरी तालुक्यातील फुलोरा हेटी ग्रा.पं. अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे ५ लाख, चेक पुल्लूर ग्राम पंचायत अंतर्गत आक्सापूर अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे ५ लक्ष, वढोली येथील अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्स्त्याचे बांधकाम करणे ५ लाख, बेरडी अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे ५ लाख, तारसा बु येथील अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे ५ लाख, अडेगाव येथील अंतर्गत सिमेंंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे ५ लाखा, नंदवर्धन येथील अंतर्गत सिमेंट क्राँक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे ७ लक्ष. राजुरा तालुक्यातील बोडगाव येथील अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे ५ लक्ष, विहिरगाव येथील अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम ५ लाख, वरोडा ग्रा.पं. येथील अंतर्गत सिमेंट क्राँक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे ५ लाख, कोहपरा येथील अंतर्गत सिमेंंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे ५ लक्ष, आर्वी ग्रा.पं. येथील अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे ५ लाख, कोलगाव येथील अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे ५ लाख, मौजा रानवेली येथील अंतर्गत सिमेंंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे १० लाख, मौजा टेंबुरवाही येथील अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम १० लाख, हिरापूर ग्रा.पं. इसापूर येथे सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम १० लाख, पाचगाव येथील अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम ५ लाख, सातरी येथील अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकामासाठी ५ लाख, कोरपना तालुक्यातील लोणी येथील अंतर्गत सिमेंंट काँक्रीट रस्त्याचे बांधकामासाठी ५ लाख, तुळशी येथील अंतर्गत सिमेंंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम ५ लाख, आसन बुज ग्रा.पं. येथील अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम ५ लाख, खिरडी ग्राम पंचायत अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम ५ लाख, गडचांदुर येथील अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम ५ लाख, अशा एकूण ३४ कामांना १ कोटी ९७ लाख रुपयांच्या निधीची प्रशासकीय मान्यता ग्रामविकास विभागाने दिली आहे. यासाठी आमदार सुभाष धोटे यांनी विशेष प्रयत्न केल्याने कामांना मंजुरी मिळाली आहे. याबाबत गोदरु पा. जुमनाके, निशीकांत सोनकांबळे, उपसभापती सुग्रीव गोतावळे, प्रल्हाद मदने, विष्णु गुरमे, रंगनाथ देशमुख, शेख ताजुद्दीन, कोरपना पंचायत समिती सभापती हिरा रणदिवे, जि.प. सदस्य उत्तम पेचे, सरोज मुनोत, नानाजी आदे, अविनाश जाधव, माजी जिल्हा परिषद. सदस्य सिताराम कोडापे, सुधाताई सिडाम, माजी पंचायत समिती सभापती साईनाथ कुळमेथे, पंचायत समिती सदस्य हर्षाली गोडे यांनी समाधान व्यक्त केले आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: 1 crore 97 lakh sanctioned for development works in assembly constituencies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.