शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

पंचविशीच्या उंबरठय़ावर जिंदगीचा बाऊन्सर आदळतो तेव्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 5:06 PM

पंचविशीचं सुंदर वय पण या वयातच सध्या तारुण्याच्या वाटय़ाला जी अखंड पळापळ येतेय, तिचं काय?

ठळक मुद्देवयाची गाडी रिव्हर्स घेता येत नाही, पण जगणं तर शोधता येईल या वळणावर.

- कृत्तिका शहा

पंचिवशीत जात असताना हे शब्दच इतके गंभीर आहेत जसं की कोणी तरी मरणारे आता. खरंच पण पंचिवशी आली की जरा धडधडतंच. कोपर्‍यावरच्या क्र श च लग्न होतं आणि मग जग सुना सुना लागे .वगैरे. आपल्याला कळतं की आपल्यावर आता जबाबदार्‍या आहेत. बेसिकली काही न कळता खूप काही कळायची वेळ आलेली असते. धीर धरी रे बधिरा पोटी मिळे फळे नाजूक ग्रीनटी! हाहा. सुटलेल पोट आणि  हळूहळू कपाळावरून हेअर लाईन एक एक मिलिमीटर मागे सरकायला लागते! सगळी कपल्स आपल्यालाच जळवण्यासाठी लग्न करतात असं वाटू लागतं. आणि आपल्याला अजूनही कोणी पटत नाही याचं वाईट वाटतं. फिट व्हायच्या नादात तुम्ही कार पूल करून हापिसात जातो. आजकाल तिथं जिम फुकट असतं.

जाडय़ा मुलींनी असं काय पाप केलं असेल? बाकी आया भारी. त्यांना त्यांच्या ढेरपोटय़ा पोराला त्यांना चवळी हवी असते.  तुम्ही जिम ला जाता डाएट खाता आणि या सगळ्यात ‘पीस’ म्हणजे शांतता कुठे आहे हे शोधता, मग हॉटेलात ग्रीन पीस खाता. पनीर तुम्हाला चालत नाही आणि दिसेल ते डियो मारून मुली पटत नाही हे कळूनही  लाल निळ्या बाटल्या फस्त करता! उन्हात फिरून चेहरा काळवंडतो आणि आपल्याला वाटतं किती काम करतोय आपण. लेट नाईट काम, तरीही डेडलाइन्स नाही पूर्ण झाल्या की मात्र बॉस असतोच. त्यात आपलं मांकड होतं आणि आपण उगाच बाहुबलीचा आव आणतो. खरं तर बळी कधीच गेलेला असतो.

ताजमहाल घेण्याची स्वप्न बघतो आणि  घराचे हफ्ते फिटत नाहीत. आपल्याला अचानक वाटतं मतदान आपला अधिकार आहे (च) आणि या चराचरात आपल्याला मत मांडायलाच हवं त्यासाठी अशक्य सारख सतत गुगल करून तुम्ही काहितरी सर्च करता जेव्हा माहीत असतं की सोडून देणं या सारखं सुख जगात नाही! पण काय करणार. अत्तराचा सोस आहे का ऑनलाइन असण्याला. तुम्ही स्क्र ोल काय करता ट्रोल काय करता आणि जमलंच तर लॉल ही करता. आयुश्याच लॉलीपॉप करून टाकता.

पुलं काय वाचता आणि वपु काय टाकता. अरे मिशी मागे लपलेल्या आगाऊ माणसाला इतके कसे घाबरता? लाईफ आफ्टर डिडक्टिंग टीडीएस सुरू होते आणि सेव्हिंग इन पीपीएफ सुरू होतं.  मधेच आपण नसलेले छंद जोडतो फक्त स्टेटस म्हणून काहीतरी असावं नाही? म्हणून चढतो आपण रायगडाचे रस्ते आणि  फिरवतो लेह च्या रस्त्यांवरून गाड्या. पण पाया खालच्या गांडुळाचं काय छोटया??  लिवाईसच्या जिन्सा फाडता.  आपल्या खाण्या च्या कहाण्या तुम्ही सतत पोस्ट करता. अन्न हे सार्‍या ब्राह्मडाला दाखवून त्याचा पूर्णब्रह्म करता. सतत चेक इन मारता वीकएंड ला दारू ढोसता. डोळ्या  खालच्या काळ्या  वर्तुळांना कोरफड लावतो. आयुष्याचं डेबिट क्रेडिट मांडत बसतो. चेहर्‍याला हळदी चंदन फासतो आणि कॉलेज गर्ल दिसतोही.  अलीकडे एक जीबी तासाला पुरत नाही आधी वर्ष म्हंटल तरी पुरलं असतं!

गोष्ट इथेच संपत नाही!

मग एखाद्या दिवशी हे कळतं, की आपल्या चड्ड्या म्हणजे मि त्र लंगोटी वाले हो. त्यांना पण आपण कळलो असंच नाही आणि आपण लीलया माणसांना चाळणी लावतो. अरे मग कळत ग्रुपी हे थोतांड आहे आणि सेल्फी ईतकी आगाऊ मजा कशातच नाही. मधेच कळायला लागतं आयुष्य स्लो मो सारखं सुरू आहे, दिवस संपेनासे होत असताना रात्नींना कात्नी लागते.  आता गाडी रिव्हर्स घेता येत नाही फास्ट पळवता येत नाही मग शोधता पळवाटा स्वतर्‍ला न शोधण्याच्या. असंख्य मेडिटेशन कॅम्प ला जाता पण तुमचं टेन्शन काही जात नाही.  असंच मग एका संध्याकाळी तिशीत गेल्याचा केक कापता, चेहर्‍यावर  सुरकुत्यांना नुकतीच सुरवात झालेली असते एखादा पांढरा केस डोकावू लागतो. आणि आपण शोधत राहतो स्वत:लाच या सार्‍या पसार्‍यात.