बारावीनंतर पुढे काय? -तुमचा निर्णय ‘या’ कसोटय़ांवर घासून पहा.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 16:30 IST2017-07-25T12:59:35+5:302017-07-25T16:30:57+5:30
खूप मार्क मिळाले म्हणून, स्कोप आहे म्हणून एखाद्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्याल तर पस्तावाल!

बारावीनंतर पुढे काय? -तुमचा निर्णय ‘या’ कसोटय़ांवर घासून पहा.
श्रुती पानसे
बारावीनंतर सर्वांचीच पाऊले करिअरची वाट चालायला लागतात. ‘चांदतारे तोड लाऊ, सारी दुनियापर मैं छाऊ, बस इतनासा ख्वाब है. ’ असे अरमान सगळ्यांचेच असतात. खरं तर आपल्यात खूप धमक आहे, आपले निर्णय बरोबरच ठरणार. आपण हुशार आहोत, नसलो तरी मेहनती आहोत. कष्ट केले की फळ मिळणारच, असा भाव डोक्यात पक्का बसलेला असतो. जर तुम्ही करिअरच्या निवडीच्या या टप्प्यावर असाल हेच सगळं मनात असणार हे नक्की. पण तुम्हाला आता करिअरचा निर्णय घ्यायचा असेल तर एक करा, प्रामाणकिपणे तुमच्या मनाला विचारा की आपल्या जवळपासची यशस्वी माणसं कोण आहेत? आपल्याला यशस्वी वाटणा-या लोकांची यादी करा. ही माणसं इतरांपेक्षा वेगळी आहेत का? काय वेगळेपण आहे त्यांच्यात? असे कोणते वेगळे गुण आहेत की ज्यामुळे ते इतरांपेक्षा वेगळे वाटतात? असा विचार केला तर आपल्याला त्यांचे गुण सहजपणाने कळतात.
प्रत्येकाला आपल्या करियरचा निर्णय स्वतर्लाच घ्यावा लागतो. अशावेळी असं वाटतं की एकवेळ शाळा- कॉलेजमधल्या परीक्षा देणं सोपं होतं; पण त्यानंतर वाढून ठेवलेली करिअरची निवड करणं अवघड. करिअरच्या अतोनात संधी उपलब्ध आहेत. आपण महाराष्ट्रात राहतो, तो तर शिक्षणासाठी पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. आता तर इथल्या संस्थांची ख्याती परदेशात पोचल्यामुळे तिथले विद्यार्थी भारतात- विशेषतर् महाराष्ट्रात येऊन शिकतात. अशा वातावरणात आपणही मागे राहू नये अशी इच्छा कोणाचीही असणार.
शहरी भागात तर अक्षरशर् हजारो प्रकारचे नवेनवे कोर्स चालतात. विविध भाषाशिक्षणापासून ते फोटोग्राफीपर्यंत, कॉम्प्युटर, स्क्रि प्ट रायिटंग पासून इंजिनिअरिंग, मॅनेजमेंटपर्यत सर्वकाही शिकवणार्या संस्था आणि व्यक्ती इथे आहेत. आपल्याला जे शिकायचं असेल ते शिकू शकतो. फक्त शिकण्याची इच्छा आणि पैसा पाहिजे. आत्ता पैसे नसतील तर शैक्षणिक कर्जाचीही सोय आहे. अशा वातावरणात कोणत्याही तरुण मुला-मुलींना गांगरून जायला होणारच. नक्की काय करायचं, काय शिकायचं, शिक्षण कुठे थांबवायचं, कोणत्या क्षेत्नातली नोकरी लाभदायक, ती कुठे मिळेल, हे प्रश्न असतात. एकदा नोकरी मिळाली की प्रश्न संपला, असंही वातावरण नाही. नोकरीतही सतत नवीन गोष्टी, नवीन तंत्नं शिकत राहावी लागतात. अन्यथा मागे पडण्याचा धोका असतो. मिळालेली नोकरी टिकवून ठेवण्यात धन्यता मानण्याचाही काळ गेलाच.कितीही पगार असला आणि कामात समाधान असले तरी नव्या संधी, आधिक पगाराची नोकरी प्रत्येकाला हवीशी वाटते, हे वास्तव आहे.
मात्र हे सारे निर्णय आपल्या मार्कावर घेऊ नका. हल्ली दहावीत अनेकांना खूप मार्क मिळतात. सहज 90} च्या पुढे जातात अनेकजण. आता एवढे गुण मिळालेत, तर चला सायन्सकडे, असं अनेकांना वाटतं. वास्तविक त्यांना मनातून चांगलं माहीत असतं की आपला पिंड सायन्सचा नाही. आपल्याला इतर काही गोष्टी आवडतात, त्यात करिअर करायचं आपण ठरवतोय. पण मार्काचा मोठ्ठा आनंद झालेला असतो. पालकांचंही तेच मत असतं. म्हणून ते सायन्सकडे जातात. प्रवेश मिळतो, पण या विषयांची आवड असते का, असा प्रश्न स्वतर्ला विचारायला हवा.
दोन वर्षांपूर्वी दहावीत भरपूर मार्क मिळाले म्हणून शास्त्न शाखेकडे गेलेल्या मुलीने सहा महिन्यातचच अकरावी सायन्सचा धसका घेतला. कशीबशी वार्षिक परीक्षा दिली आणि तिथून बाहेर पडली. एक वर्षं वाया गेलं. मग आर्टस कडे वळली आहे. एका वर्षाची फी वाया गेली म्हणून वडिलांची भरपूर बोलणी खाल्ली. हे पैसे थोडेथोडके नसतात. हजारोंच्या घरात असतात. एवढे पैसे वाचले असते तर त्या भांडवलात एखादा व्यवसाय सुरू करता येईल, अशी ती रक्कम असते.
म्हणून सुरु वातीलाच आपल्या मनाचा नीट कौल घ्यायला हवा. आपली ध्येयं काय आहेत, आपल्याला नक्की काय करायचंय असे प्रश्न आधी विचारायला पाहिजेत. चांगलं शिक्षण घेतले की करिअरच्या अनेक वाटा खुल्या होतात. आपल्याला हव्या त्या क्षेत्नात काम करता यावं, नीट पैसे मिळवावेत असं प्रत्येकाचंच स्वप्न असतं. त्यादृष्टीने मनाशी काही एक आखणी सुरू असेल. या आखणीला आणि त्या प्रकारच्या योजनांना पाया भक्कम असायला हवा.
पुढे सुचवलेल्या काही गोष्टींचा विचार नक्की करा.
स्वतः ला तपासा आणि मग पुढे जा.
रिझल्ट
ज्या अभ्यासक्र मात प्रवेश घ्यायला जास्त मार्काची अपेक्षा असते, त्यासाठी आधीपासून प्रयत्न करून तेवढे मार्क मिळवायलाच हवेत. पण मार्क जास्त मिळाले, म्हणून नको त्या विषयाकडे जाऊ नका. रिझल्ट आवश्यक आहेच, पण फार नाही.
कल
आपल्याला करिअर म्हणून कशाची निवड करायला आवडेल, हे कदाचित धूसर असेल. माहिती नसेल. पण निदान काय करायला आवडणार नाही, हे तर नक्कीच माहीत असतं.
संधी
‘मला आवडतं ’ या एकाच कारणासाठी भलत्याच कोर्सला जाऊ नका. या क्षेत्नात पुढे नोकरी / व्यवसायची संधी आहे का हे बघा. विचारा. तरीही एखाद्या ‘हटके’ क्षेत्नाकडे जायचं असेल तर संधी निर्माण करण्याची धमक तुमच्यात असली पाहिजे. ती आहे का हे तपासा
अनुभवींचा सल्ला
गेल्या दोन वर्षात ज्यांनी करिअरचा निर्णय घेतला आहे त्यांच्याशी बोला. यातले काही समाधानी असतील, तर काही असमाधानी असतील. त्यांचे अनुभव विचारा. दोघांकडूनही उपयुक्तच माहिती मिळेल.
अनुभवींचे निरीक्षण
आपल्याला जी करिअरची वाट निवडावीशी वाटते आहे, त्या वाटेवर आधी जे पोहचलेत, प्रत्यक्ष कामाला लागले आहेत. त्यांच्या कामाचं, जीवनशैलीचं, ताणतणावांचं आणि अर्थातच पॅकेजचाही विचार करा. प्रत्यक्ष निर्णय घ्यायला याचा उपयोग होईल.
विविध टेस्ट
तुम्ही कदाचित वेगवेगळ्या सायकोलॉजिकल टेस्ट्स करून घेतल्या असतील किंवा करायच्या विचारात असाल, टेस्ट जरूर करा. टेस्ट योग्य प्रकारे झाली नाही तर मनाचा गोंधळ उडवणारे निकाल येतात. त्यामुळे आपल्या मनाचा कल तुम्हालाच जास्त कळतो, हे लक्षात घ्या.
नव्या गोष्टी करा; पण विचारपूर्वक
- वयाच्या या टप्प्यावर बंडखोरी असते. मळलेल्या वाटेला सोडून नवीन काही करण्याची उर्मी नैसिर्गकरित्या मनात येत असते. या विचारांना कृतीची जोड मिळाली र नव्यात गोष्टी हातून घडण्याची शक्यता असते. ‘आऊट ऑफ द बॉक्स म्हणजेच चौकटीबाहेर विचार करण्याची क्षमता प्रत्येकात असू शकते. या क्षमतेवर विश्वास ठेवा. एखाद्या करियरच्या मागे धावताना प्रत्येक वेळी चाकोरीपेक्षा थोडा वेगळा विचार कराच. आजच्या काळात तो आवश्यक आहे.
मैत्रीवर जबाबदारी नको
- मित्राने किंवा मैत्रिणीने एखादी गोष्ट ठरवली म्हणून तुम्ही ठरवली असं नको. स्वत:चा निर्णय स्वतर् घ्या. निर्णयाची जबाबदारी घ्या.
नियोजन -
आपण नियोजन करण्यातच चूक केली, तर त्याचे दुष्परिणाम होतात याचे अनेक अनुभव आपल्याकडे जमले असतील. पण उत्कृष्ट नियोजनाचे फायदेही मस्तच असतात. आपला आयुष्यभराचा निर्णय कोणाच्याही अपेक्षांच्या दबावाखाली घेऊ नका. ज्या प्रकारचं काम करताना कंटाळा येणार नाही, उत्साह वाटेल तीच वाट स्वीकारली पाहिजे.
( लेखिका शिक्षण अभ्यासक आहे मेंदू अभ्यासतज्ज्ञ आहेत.)