सरकारी नोकरी मिळवण्याची संधी, ही विमा कंपनी 6,400 रिक्त जागा भरणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2022 13:51 IST2022-12-25T13:51:11+5:302022-12-25T13:51:48+5:30
ESIC Job Vacancies : कर्मचारी राज्य विमा महामंडळ म्हणजेच ईएसआयसीने (ESIC) 6400 पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारी नोकरी मिळवण्याची संधी, ही विमा कंपनी 6,400 रिक्त जागा भरणार!
नवी दिल्ली : सरकारी विमा कंपनीने एक खुशखबर आणली आहे. कंपनी आपल्या विविध पदांसाठी 6400 हून अधिक रिक्त जागा भरणार आहे. म्हणजे हजारो तरुणांना सरकारी नोकऱ्या मिळण्याची संधी मिळणार आहे. दरम्यान, कर्मचारी राज्य विमा महामंडळ म्हणजेच ईएसआयसीने (ESIC) 6400 पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये 2 हजार डॉक्टरांव्यतिरिक्त टिचिंग फॅकल्टीचाही समावेश आहे.
23 हॉस्पिटल आणि 60 डिस्पेंसरीवर काम सुरू
- चेन्नईतील केके नगर येथील ईएसआयसी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या दुसऱ्या ग्रॅज्युएशन डे निमित्त केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले की, ईएसआयसी कर्मचाऱ्यांना कौशल्य-आधारित प्रशिक्षण कार्यक्रम उपलब्ध करून दिला जाईल.
- ईएसआयसीने 10 सर्टिफिकेट कोर्सही सुरू केले आहेत.
- केंद्र सरकारच्या निर्मितीसह, शक्ती उपक्रमांतर्गत देशात 100 खाटांची 23 नवीन हॉस्पिटल उघडली जात आहेत.
- यासोबतच 60 डिस्पेंसरी सुरू करण्यात येणार आहेत.
- भूपेंद्र यादव यांच्या म्हणण्यानुसार, जखमी कामगार आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांना आपल्या घराजवळ क्वालिटी मेडिकल सर्व्हिस उपलब्ध करून देणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे.
- यासोबतच अधिकाधिक लोकसंख्येला सेवा मिळाव्यात, अशी सरकारची इच्छा आहे.
- केंद्रीय मंत्री म्हणाले की, भारतातील तीन शहरांमधील ईएसआयसी हॉस्पिटलमध्ये कॅथ लॅब सुरू करण्यात आल्या आहेत.
- मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा प्रॅक्टिसला प्रोत्साहन देण्यासाठी ईएसआयसीने 15 इंडस्ट्रिअल क्लस्टर्ससाठी मेडिकल हेल्थ चेकअप सुरू केली आहे.
- आता केवळ कामगारच रुग्णालयांमध्ये पोहोचत नाहीत, तर ईएसआयसी कामगारांपर्यंत त्यांच्या कामाच्या ठिकाणीही पोहोचत आहे.