शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

बँकिंग क्षेत्रात नोकरीची सुवर्णसंधी, युनियन बँकेत बंपर भरती; अशी आहे पात्रता आणि अटीशर्ती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2021 15:21 IST

Union Bank of India Recruitment 2021: युनियन बँकेमध्ये विविध स्पेशालिस्ट पदांसाठी भरती निघाली आहे. युनियन बँकेच्या मुंबईस्थित मुख्यालयामधून ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

मुंबई - बँकिंग विभागात नोकऱ्यांचा शोध घेत असलेल्या तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. युनियन बँकेमध्ये विविध स्पेशालिस्ट पदांसाठी भरती निघाली आहे. युनियन बँकेच्या मुंबईस्थित मुख्यालयामधून ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. (Union Bank of India Recruitment 2021) युनियन बँक भरती २०२१ साठी अर्ज unionbankofindia.co.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन करता येतील. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख ३ सप्टेंबर २०२१ आहे. (government jobs update) नोटिफिकेशननुसार युनियन बँक भरती २०२१ अंतर्गत एकूण ३४७ पदे भरली जाणार आहेत. ही भरती एमएमजीएस-III आणि एमएमजीएस -II व एमएमजीएस-I ग्रेड अंतर्गत होणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना युनियन बँकेच्या कुठल्याही शाखेत नियुक्त करण्यात येणार आहे. (Job opportunities in the banking sector, bumper recruitment in Union Bank; Such is the eligibility and conditions)

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुरुवात १२ ऑगस्ट २०२१ पासून झाली आहे. तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख ही ३ सप्टेंबर २०२१ आहे.या भरती प्रक्रियेमधून भरल्या जाणाऱ्या पदांचे विवरण हे पुढील प्रमाणे आहे. सिनियर मॅनेजर (रिस्क) - ६० पदे मॅनेजर (रिस्क) - ६० पदेमॅनेजर (सिव्हिल इंजिनियर) - ०७ पदेमॅनेजर (आर्किटेक्ट) - ०७ पदे मॅनेजर (इलेक्ट्रिकल इंजिनियर) -०२ पदे मॅनेजर (प्रिंटिंग टेक्नॉलॉजिस्ट) -०१ पदमॅनेजर (फॉरेस्क) -५० पदे मॅनेजर (सीए) - १४ पदे  असिस्टंट मॅनेजर (टेक्निकल ऑफिसर) -२६ पदेअसिस्टंट मॅनेजर (फॉरेक्स) १२० पदे

शैक्षणित पात्रतासिनियर मॅनेजर (रिस्क) - ग्लोबल असोसिएशन ऑफ रिस्क मधून फायनान्शियल रिस्क मॅनेजमेंटमध्ये सर्टिफिकेशन किंवा प्रीमा इन्स्टिट्युटमधून प्रोफेशनल रिस्क मॅनेजमेंटमध्ये सर्टिफिकेशन  मॅनेजर (रिस्क) - ग्लोबल असोसिएशन ऑफ रिस्कमधून फायनान्शियल रिस्क मॅनेटमेंटमध्ये सर्टिफिकेशन किंवा प्रीमा इंस्टिट्युटमधून प्रोफेशनल रिस्क मॅनेजमेंटमध्ये सर्टिफिकेशन मॅनेजर (सिव्हिल इंजिनियर) - ग्लोबल असोसिएशन ऑफ रिस्कमधून फायनान्शियल रिस्क मॅनेजमेंटमध्ये सर्टिफिकेशन किंवा प्रीमा इन्स्टिट्युटमधून प्रोफेशनल रिस्क मॅनेजमेंटमध्ये सर्टिफिकेशनमॅनेजर (आर्किटेक्ट) - आर्किटेक्टमध्ये बॅचल डिग्री किमान ६० टक्के गुणांसह   मॅनेजर (इलेक्ट्रिकल इंजिनियर) - इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगमध्ये किमान ६० टक्के गुणांसह बीई/बी.टेक मॅनेजर (प्रिंटिंग टेक्नॉलॉजिस्ट) - प्रिटिंग टेक्नॉलॉजीमध्ये बीई किंवा बीटेक मॅनेजर (फॉरेस्क) - फुल टाइम एमबीए कोर्समॅनेजर (सीए) - सीएची पदवी    असिस्टंट मॅनेजर (टेक्निकल ऑफिसर) - सिव्हिल/इलेक्ट्रिकल/मॅकॅनिकल/प्रॉडक्शन/मेटलर्जी/इलेक्ट्रॉनिक्स पैकी कुठल्याही विषयामधून इंजिनियरिंगची पदवीअसिस्टंट मॅनेजर (फोरेक्स)- फुल टाइम एमबीएची पदवी.

या भरती प्रक्रियेमधून भरल्या जाणाऱ्या पदांसाठीची वयोमर्यादा पुढील प्रमाणे आहे. - सिनियर मॅनेजर - ३० ते ४० वर्षे- मॅनेजर - २५ ते ३५ वर्षे- असिस्टंट मॅनेजर २० ते ३० वर्षे या भरतीसाठीचे प्रवेश शुल्क हे सर्वसामान्य, इडब्ल्यूएस आणि ओबीसींसाठी ८५० रुपये आहे. तर एससी, एसटी आणि दिव्यांगांसाठी निशुल्क आहे.  

टॅग्स :jobनोकरीBanking Sectorबँकिंग क्षेत्रgovernment jobs updateसरकारी नोकरी