शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

वकिल व्हायला निघालेल्या थिओची गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 15:32 IST

13 वर्षाचा एक मुलगा, जरासा नाठाळ, त्याला वकिल व्हायचंय पण या वयात त्याच्या वाटय़ाला जे येतं, ते भन्नाट आहे.

ठळक मुद्देएक साधंसं पुस्तक पण स्वप्न पाहायच्या वयातली विलक्षण जिद्द सांगतं.

-अपर्णा करमरकर

पुस्तकाचा नायक, थिओडोर बून हा तेरा वर्षांचा, आठव्या इयत्तेत शिकणारा अमेरिकन मुलगा आहे. बाकीच्या या  वयाच्या मुलाचं जसं जग असतं, तसंच थिओचंही आहे. शाळा, शाळेचा अभ्यास, तिथला डिबेट ग्रुप, स्काउट्स बरोबर अधूनमधून कँपिंग ट्रीप इत्यादी. त्याचे आई - वडील दोघेही वकिल आहेत.  दोघेही आपल्या कामात अगदी गर्क आहेत.  थिओवर त्यांचं खूप प्रेम आहे आणि आईवडीलांच असायला हवं, तसं त्याच्यावर बारीक लक्षही आहे. आपण फार वेडेवाकडे उद्योग केले, तर आपले आईवडील आपले कान उपटतील हे थिओला अगदी पक्कं ठाऊक आहे. थिओचा एक दारूचं व्यसन असलेला एक काका, त्याची एप्रिल नावाची एक मैत्नीण,त्याचा लाडका कुत्ना  जज  आणि इतरही काहीजण या पुस्तकात आपल्याला भेटतात.    थिओडोर बून (स्कँडल)नावाच्या पुस्तकाची ही गोष्ट.

जेव्हा पुस्तकातले मुख्य पात्न एखादं लहान मूल असतं, तेव्हा बर्‍याचदा अशी मुलं  आदर्श अपत्य  कॅटॅगरीवाली असतात. अभ्यासात एकदम हुशार, स्मार्ट, समाजसेवा करणारी, गोडगोड खोड्या करणारी, लगे हाथ एखादा चोर-बीर पकडून देणारी आणि वयस्कर लोकांची सेवासुद्धा करणारी.

थिओ मात्न असा नाहीये. तो खरा वाटतो, कादंबरीतील पात्न नाही. त्याच्यासारखी खूप मुलं आपण आपल्या आसपास पाहतो. अंघोळीचा कंटाळा करणारी, आजारपणाचं नाटक करून शाळा बुडवता येते का याची चाचपणी करणारी, शाळेत आपला वेळ वाया जातोय. आपण खरं म्हणजे डायरेक्ट कॉलेजमध्येच जायला पाहिजे, अशी ठाम समजूत असणारी!!

थिओ स्वतर्‍ला बाल-वकील मानतो. त्याच्या आई-बाबांच्या वकिली ऑफिसमध्ये त्याच्यासाठी स्वतंत्न अशी एक छोटी खोली आहे. शाळा सुटल्यावर तो तिथे येतो. त्याचा गृहपाठ वगैरे करतो. त्या खोलीला थिओ त्याचं  ऑफिस  असं म्हणतो आणि बाकीच्यांना म्हणायलाही लावतो. त्याच्या लहान गावातल्या बहुतेक सगळ्या पोलीस अधिकार्‍यांना , वकिलांना  न्यायाधीशांना, न्यायालयातल्या कर्मचार्‍यांना तो नावानिशी ओळखतो. पाळीव प्राण्यांसाठीच्या कोर्टात बाजू मांडण्यासाठी वकील असण्याची गरज नसते, तिथे तो आपली वकिलीची हौस भागवून घेतो. शाळेतल्या मुलांनाही जमेल तसे कायद्यासंबंधी सल्लेही देतो.

मोठेपणी वकील किंवा न्यायाधीश व्हायचं, हे थिओने मनाशी अगदी पक्कं ठरवलं आहे. आठव्या इयत्तेतील गणितबिणीत शिकण्यापेक्षा विधी महाविद्यालयात जाऊन कायद्याचं शिक्षण घ्यायला त्याला मनापासून आवडेल. पण ही दुष्ट शिक्षण व्यवस्था त्याला त्याची ही महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी हे रटाळ विषय शिकायला लावते आहे!

अमेरिकेतील शिक्षणपद्धतीत हायस्कूलच्या वर्षांना फार महत्त्व आहे. तिथे निवडलेले विषय पुढच्या वाटचालीसाठी कळीचे असतात. त्यासाठी मुलांची प्रतवारी ठरवता यावी, म्हणून एक चाचणी परीक्षा घ्यायची, असा शिक्षण मंडळाचा निर्णय होतो. परीक्षा होते. निकाल लागतो. नेहमीप्रमाणे कोणाला अपेक्षेपेक्षा जास्त, तर कोणाला कमी गुण मिळतात.

पण या परीक्षा आणि  निकालासंदर्भातील एक धक्कादायक माहिती थिओ आणि त्याच्या मैत्रिणीला, एप्रिलला कळते आणि ही मुलं एका झंझावातात अडकतात. काही गैरप्रकार झाले असल्याने हे सर्व प्रकरण न्यायालयात जातं. पुस्तकातली एक एक करून सर्वच पात्न त्यात गुंतत जातात. शेवटी विजय सत्याचा, न्यायाचा होतो, हे सांगायला नकोच! सगळ्या घटनांचा विलक्षण असा वेग, गुंतागुंत आणि  प्रवाही भाषेमुळे आपल्याला पुस्तक खाली ठेवताच येत नाही.

या मालिकेतल्या इतर पुस्तकांचे लेखक, जॉन ग्रीशाम पेश्याने वकील. ह्या लेखकाची बरीच पुस्तके न्यायालये, वकील,ज्यूरी अशा विषयांशी संबंधीत आहेत. अपरिहार्यपणे खून, अत्याचार ह्याबद्दलची चर्चा पुस्तकांमधून असते. पण त्याची  थिओडोर बून  ही मालिका मात्न वेगळी आहे. साधारण बारा-पंधरा वयोगटातल्या मुलांना योग्य असे विषय  भाषा आणि  मांडणी इथे वाचायला मिळते.

बारा-पंधरा वयोगटातील मुले परिकथा वाचायला मोठी झालेली असतात, पण अजून मोठ्यांची पुस्तके वाचायला लहान असतात. शिवाय ह्या मुलांना पुस्तकातून आपल्यावर संस्कार करायचा किंवा काही डोस पाजण्याचा प्रयत्न होतोय की काय? अशी शंका जरी आली, तरी मुले तातडीने त्या पुस्तकापासून लांब पळून जातात! थिओ बूनच्या सहा पुस्तकांची ही मालिका या वयाच्या मुलांसाठी अगदी योग्य आहे. निरनिराळ्या पेश्यांबद्दल, त्यातल्या अधिक-उण्या बाबींबद्दल मुलांना माहिती व्हावी, निदान त्याबद्दल उत्सुकता वाटावी, असं आपल्याला वाटत असत. ही पुस्तके वाचून मुलांचा वकिली  पेश्याबद्दलची उत्सुकता नक्की वाढेल.

आपणही कधीकधी आपल्या मोठेपणाला कंटाळलेलो असतो. घर, घरकाम,  घर ते ऑफिस प्रवासाच्या ताणांना अगदी कावलेले असतो. अशा एखाद्या दिवशी हे पुस्तक मोठ्यांनी नक्की वाचावं. गंभीर, टोचणार्‍या, त्नासदायक विषयांवरची पुस्तकं वाचून कंटाळा आला असेल, तर आपल्या भूतकाळात गेलेल्या रम्य, सरळसोप्या, निरागस दिवसांची आठवण ही पुस्तके वाचताना नक्की येईल.

पुस्तकाचे नाव       थिओडोर बून (स्कँडल)

लेखक              जॉन ग्रीशाम