परदेशात नोकरीचे स्वप्न होईल साकार; 'या' देशांमध्ये भारतीयांसाठी मोठी संधी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 11:17 IST2025-12-19T11:16:21+5:302025-12-19T11:17:31+5:30
अनेक देश आता उघडपणे परदेशी कुशल कामगारांना आकर्षित करत आहेत, ज्यात भारतीय व्यावसायिकांचाही समावेश आहे.

परदेशात नोकरीचे स्वप्न होईल साकार; 'या' देशांमध्ये भारतीयांसाठी मोठी संधी!
अनेक देशांमध्ये कुशल कामगारांची तीव्र कमतरता आहे. अनेक देश आता उघडपणे परदेशी कुशल कामगारांना आकर्षित करत आहेत, ज्यात भारतीय व्यावसायिकांचाही समावेश आहे.
तुम्ही तुमचा नोकरी शोध येथून सुरू करू शकता?
जर्मनी : येथे सर्वात जास्त कामगारांची कमतरता अभियांत्रिकी, आयटी आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात आहे. सरकारचे कॅटलॉग पोर्टल, "मेक इट इन जर्मनी", नोकरीच्या ऑफरपासून ते शेअरिंग आणि शिफ्टींगपर्यंत संपूर्ण रोडमॅप प्रदान करते. परदेशी लोकांसाठी एक जॉब बोर्ड देखील आहे.
इटली : येथे दरवर्षी 'डेक्रेटो फ्लुसी' कोट्याअंतर्गत बिगर-युरोपीय देशांतील कामगारांना प्रवेश दिला जातो. यामध्ये उत्पादन, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स आणि काही तांत्रिक क्षेत्रांमधील नोकऱ्यांचा समावेश आहे. परदेशी लोकांसाठी अधिकृत जॉब पोर्टल 'क्लिक लावोरो'वर मिळू शकतात.
जपान : उत्पादन, नर्सिंग केअर, फूड सव्हिस, बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी स्किल्ड वर्कर्स व्हिसा (एसएसडब्ल्यू) अधिक सुलभ करण्यात आला आहे. जेईटीआरओ (जेट्रो) चे एचआर पोर्टल, जेआयटीसीओ (जिटको), डीएआयजॉब पोर्टल येथेही संधी मिळवू शकता.
न्यूझीलंड : न्यूझीलंडची सरकारी साइट्स jobs.govt.nz आणि careers.govt.nz वर आयटी, आरोग्यसेवा, बांधकाम आणि शिक्षण या क्षेत्रातील सर्वाधिक रिक्त जागा आहेत.
या साइट्सचाही फायदा
फेडरल एम्प्लॉयमेंट एजन्सी सेंट्रल जॉब पोर्टल: येथे पात्रता तपासणी, इंग्रजीत मदतही मिळते.
इतर लोकप्रिय प्लॅटफॉर्म : जॉब बोईस, स्पेसस्टोन, जॉब्स. डीई आणि इंडीडी. डीई.
येथेही संधी आहेत
Portale Integrazione Migranti : येथे परवाने आणि नोकऱ्यांबद्दल माहिती मिळेल.
मिनिस्ट्री ऑफ लेबरचे युरेस इटली : युरोपमध्ये नोकरीसाठी एक चांगले व्यासपीठ आहे.