बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; SBI मध्ये स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसरच्या 900+ पदांसाठी भरती सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 20:31 IST2025-12-14T20:30:52+5:302025-12-14T20:31:30+5:30
SBI Jobs: जाणून घ्या निवड प्रक्रिया..!

बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; SBI मध्ये स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसरच्या 900+ पदांसाठी भरती सुरू
SBI Jobs: बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (SCO) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुक व पात्र उमेदवार SBI च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी निवड प्रक्रिया, अर्ज पद्धत, शुल्क आणि अंतिम तारीख याबाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे...
निवड प्रक्रिया
या भरतीसाठी मल्टिलेव्हल निवड प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यामध्ये एलिजिबिलिटी-आधारित स्क्रीनिंग, मुलाखत, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल चेकअप...अशा टप्प्यांचा समावेश आहे. हे सर्व टप्पे यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनाच नियुक्ती पत्र दिले जाईल.
अर्ज कसा कराल?
उमेदवारांनी सर्वप्रथम SBI च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
त्यानंतर होमपेजवरील संबंधित भरती लिंकवर क्लिक करावे.
प्रथम नोंदणी करा.
नोंदणीनंतर फॉर्म काळजीपूर्वक भरुन सबमिट करा.
सबमिट केल्यानंतर अर्ज डाउनलोड करा.
भविष्यासाठी अर्जाचा प्रिंटआउट काढून ठेवा.
अर्ज शुल्क
सामान्य, OBC आणि EWS उमेदवारांसाठी: ₹750
SC, ST आणि PwD उमेदवारांसाठी: अर्ज शुल्कात सूट (शून्य शुल्क)
अर्ज करण्याची अंतिम तारीख
या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 डिसेंबर 2025 आहे. उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वीच अर्ज सादर करावा. भरती प्रक्रियेतील ताज्या अपडेटसाठी अधिकृत संकेतस्थळावर नियमित लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.