रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 16:23 IST2025-08-26T16:23:05+5:302025-08-26T16:23:59+5:30
RRB Section Controller Recruitment: रेल्वेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे.

रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया!
रेल्वेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे भरती मंडळाने सेक्शन कंट्रोलर पदांसाठी भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करायचा आहे. येत्या १५ सप्टेंबर २०२५ पासून अर्ज प्रक्रियेला सुरूवात होईल. तर, १४ ऑक्टोबर अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या भरतीअंतर्गत एकूण ३६८ रिक्त जागा भरल्या जाणार आहे. या भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी रेल्वे भरती मंडळाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
पात्रता
उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे, तर समतुल्य पदवी देखील वैध असेल. वयोमर्यादेनुसार, उमेदवाराचे किमान वय २० वर्षे आणि कमाल वय ३३ वर्षे निश्चित करण्यात आले. सरकारच्या नियमांनुसार एससी/एसटी/ओबीसी/माजी सैनिकांना वयात सूट देण्यात आली.
निवड प्रक्रिया
रेल्वे सेक्शन कंट्रोलर भरतीची निवड प्रक्रिया एकूण चार टप्प्यात पूर्ण केली जाईल. सर्वप्रथम, उमेदवारांना संगणक आधारित चाचणी द्यावी लागेल, जी सामान्य ज्ञान, गणित आणि तर्कशास्त्र विषयांवर आधारित असेल. या चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदावारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. तिसरा टप्पा वैद्यकीय चाचणी असेल, ज्यात उमेदवारांची ए२ वैद्यकीय मानकांनुसार तपासणी होईल. यानंतर अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल
अर्ज शुल्क
रेल्वे सेक्शन कंट्रोलर भरतीसाठी सामान्य आणि ओबीसी उमेदवारांना ५०० रुपये शुल्क भरावे लागेल. तर, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला उमेदवार, दिव्यांग आणि माजी सैनिकांसाठी अर्ज शुल्क २५० रुपये ठेवण्यात आले.
अर्ज करण्याची पद्धत
- सर्वात प्रथम, रेल्वे भरती मंडळाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- तिथे, “सीईएन क्रमांक ०४/२०२५ – सेक्शन कंट्रोलर भरती” या पर्यायावर क्लिक करा.
- पुढे आवश्यक माहिती भरून नोंदणी पूर्ण करा.
- त्यानंतर लॉगिन करा आणि शैक्षणिक पात्रता आणि इतर माहिती भरा.
- पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक प्रमाणपत्रांच्या स्कॅन केलेल्या कॉपी अपलोड करा.
- डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा यूपीआयद्वारे अर्ज शुल्क भरा
- शेवटी अर्ज सबमिट करा आणि त्याची कॉपी काढून स्वत:जवळ ठेवा.