Indian Railway Recruitment: १० वी उत्तीर्ण झालेल्यांसाठी रेल्वेत काम करण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या, 'असा' करायचा अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 11:14 IST2021-05-25T11:12:22+5:302021-05-25T11:14:18+5:30
पश्चिम रेल्वेतील ३ हजार ५९१ पदांची नोकरभरती, आजपासून ऑनलाईन अर्जाला सुरूवात

Indian Railway Recruitment: १० वी उत्तीर्ण झालेल्यांसाठी रेल्वेत काम करण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या, 'असा' करायचा अर्ज
नवी दिल्ली – कोरोना संकट काळात बेरोजगार तरूणांसाठी रोजगाराची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय रेल्वेत तरूणांना नोकरीची संधी आलेली आहे. पश्चिम रेल्वेच्या अनेक रिक्त जागांसाठी भारतीय रेल्वेने जाहिरात काढली आहे. ज्या युवकांना या जॉबसाठी अर्ज करायचा असेल त्यांनी रेल्वेच्या अधिकृत वेबसाईट rrc-wr.com यावर भेट द्यावी. ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत २५ मे म्हणजे आजपासून सुरू झाली आहे.
रेल्वेत नोकरी करू इच्छिणाऱ्या युवकांनी थेट https://www.rrc-wr.com या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता. त्यासोबत या जाहिरातीबाबत अधिक माहितीसाठी
https://www.rrc-wr.com/rrwc/Act_Appr_2021-22/Apprentice_2021-22_Notification.pdf.
यावर क्लिक करू शकता.
भारतीय रेल्वेत ३ हजार ५९१ जागांसाठी ही भरती निघाली आहे. यात कारपेंटर, इलेक्ट्रिशन, इलेक्ट्रोनिक मेकेनिक, पेंटर, पाईप फिटर, प्लंबर, ड्राफ्ट्समन, वेल्डर, डिझेल मेकॅनिक, रेफ्रिजरेटर एसी मेकॅनिक इत्यादी जागा भरल्या जातील.
अर्ज करण्याची मुदत
या भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत २५ मे २०२१ सकाळी ११ पासून २४ जून २०२१ च्या संध्याकाळी ५ वाजेपर्यंत युवकांना अर्ज करण्याची संधी आहे.
शैक्षणिक पात्रता
उमेदवारांसाठी शैक्षणिक पात्रता कमीत कमी १० वीची परीक्षा अधिकृत बोर्डातून ५० टक्के मार्कासह उत्तीर्ण झालेला असावा. त्यासोबत शासनमान्यता प्राप्त ITI प्रमाणपत्र गरजेचे आहे.
वयोमर्यादा
या जॉबसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा १५ ते २४ वयोगटातील हवी.