RBI Recruitment: रिझर्व्ह बँकेत ऑफिसर पदांसाठी भरती, १ लाख पगार! कोण करू शकतं अर्ज?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 16:02 IST2025-09-09T16:01:09+5:302025-09-09T16:02:09+5:30
Bank Job 2025: बँकेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे.

RBI Recruitment: रिझर्व्ह बँकेत ऑफिसर पदांसाठी भरती, १ लाख पगार! कोण करू शकतं अर्ज?
बँकेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकने ऑफिसर पदासाठी नोकरीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. दरम्यान, १० सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली असून ३० सप्टेंबर २०२५ (संध्याकाळी ६ वाजेपर्यंत) अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. या नोकरीसाठी इच्छूक असणारे उमेदवार आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.
या भरती अंतर्गत एकूण १२० पदे भरली जाणार आहेत, ज्यात ग्रेड बी अधिकारी:जनरल (जागा:८३) ग्रेड बी अधिकारी: डीईपीआर (जागा-१७) आणि ग्रेड बी अधिकारी: डीएसआयएम (जागा-२०) यांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
शैक्षणिक पात्रता:
जनरल: कोणत्याही विषयात किमान ६० टक्के गुणांसह पदवी किंवा कोणत्याही विषयात पदव्युत्तर पदवी.
डीईपीआर: पदव्युत्तर पदवी ही अर्थशास्त्र/वित्त/पीजीडीएम/एमबीए पदवीमध्ये पदव्युत्तर पदवी असावी.
डीएसआयएम: किमान ५५ टक्के गुणांसह सांख्यिकी/गणित विषयात पदव्युत्तर पदवी.
निवड प्रक्रिया:
एकूण तीन टप्प्यात उमदेवारांची निवड केली जाईल. पहिल्या टप्प्यात उमेदवाराला पूर्वपरीक्षा होईल, यात उत्तीर्ण झालेले उमेदवार मुख्यपरीक्षेसाठी पात्र असतील. त्यानंतर उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलवले जाईल. परीक्षेच्या पॅटर्नची माहिती अधिसूचनेत जाहीर केली जाईल.
अर्ज शुल्क:
- सामान्य, ओबीसी, ईडब्ल्यूएस: ८५० + जीएसटी
- एससी, एसटी, पीडब्ल्यूडी : १०० + जीएसटी
- आरबीआय कर्मचारी: मोफत
पगार:
दरमहा ५५ हजार २००- ते ९९ हजार ७५० रुपये पगार दिले जाणार आहे, इतर भत्ते देखील दिले जातील.
अर्ज कसा करायचा?
- सर्वात प्रथम, आरबीआयची अधिकृत वेबसाइट rbi.org.in ला भेट द्या .
- त्यानंतर होम पेजवरील Recruitment या पर्यायावर क्लिक करा.
- पुढे RBI Assistant Recruitment 2023 वर क्लिक करा.
- अप्लाय ऑनलाइनवर क्लिक करा आणि सर्व माहिती वाचा
- आवश्यक कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
- अर्ज शुल्क भरा आणि फॉर्म भरल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.