बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २०२६ वर्षासाठी 'सहाय्यक' पदांच्या एकूण ६५० जागांसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १६ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू झाली असून, पात्र उमेदवारांना ८ मार्च २०२६ पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.
आयबीआय नोकरी: शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
शिक्षण: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयातील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.गुण: सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी पदवीमध्ये किमान ५० टक्के गुण अनिवार्य आहेत, तर एससी/एसटी/अपंग उमेदवारांसाठी केवळ उत्तीर्ण गुण पुरेसे आहेत.कौशल्य: उमेदवाराला संगणकावर वर्ड प्रोसेसिंगचे ज्ञान असणे आवश्यक आहे. तसेच, ज्या राज्यातून अर्ज करत आहात, तिथल्या स्थानिक भाषेचे ज्ञान असणे बंधनकारक आहे.वयोमर्यादा: किमान २० वर्षे आणि कमाल २८ वर्षे. (राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमानुसार वयात सवलत दिली जाईल).
आयबीआय नोकरी: पगार
निवडलेल्या उमेदवारांना सुरुवातीला ₹२९,००० मूळ वेतन मिळेल. मात्र, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि इतर विविध भत्त्यांसह एकूण मासिक वेतन अंदाजे ₹५८ हजार ५१४ (HRA वगळून) इतके असेल.
आयबीआय नोकरी: निवड प्रक्रिया १. पूर्व परीक्षा: १०० गुणांची परीक्षा२. मुख्य परीक्षा: २०० गुणांची परीक्षा (अंतिम गुणवत्ता यादीसाठी या परीक्षेचे गुण ग्राह्य धरले जातील.)३. भाषा चाचणी: ज्यांनी मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली आहे, त्यांना संबंधित राज्याच्या स्थानिक भाषेची परीक्षा द्यावी लागेल. ही चाचणी केवळ पात्रता स्वरूपाची असेल.
अर्ज शुल्क
- सामान्य, ओबीसी आणि ईडब्लूएस: ₹४५० + १८ टक्के जीएसटी.- एसी, एसटी, पीडब्लूबीडी आणि माजी सैनिक: ₹५० (सूचना शुल्क) + १८ टक्के जीएसटी.- आरबीआय कर्मचाऱ्याकडून कोणतीही फी आकारली जाणार नाही.
Web Summary : RBI offers golden opportunity for banking aspirants. Apply for 650 Assistant posts by March 8, 2026. Graduates with 50% marks eligible. Salary up to ₹58,000.
Web Summary : आरबीआई ने बैंकिंग उम्मीदवारों के लिए सुनहरा अवसर दिया है। 8 मार्च 2026 तक 650 सहायक पदों के लिए आवेदन करें। 50% अंकों के साथ स्नातक पात्र। वेतन ₹58,000 तक।